शहीद जवानांना पत्रकारांच्या वतीने वाहण्यात आली आदरांजली

 



14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे झालेल्या  दहशतवादी भ्याड हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते त्यात  बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरचे सुपुत्र संजयसिंह राजपूत यांचा देखील समावेश होता या हल्ल्याला आज चार वर्षे पूर्ण झाली असून आहे.आज 14 फेब्रुवारी रोजी  शहिद संजयसिह राजपूत यांच्या समाधीस्थळी मलकापूर येथील पत्रकारांच्या वतीने आदरांजली   वाहण्यात आली.  यावेळी जेष्ठ पत्रकार विरसिहदादा राजपूत,हरिभाऊ गोसावी,धनश्रीताई काटिकर  गौरव खरे,समाधान सुरवाडे,स्वप्नील अकोटकर, अक्षय थिगळे, विनायक तळेकर, नाथ्थू हिवरळे, प्रकाश थाते,प्रदीप इंगळे,धर्मेश राजपूत, सैय्यद ताहेर  आदी पत्रकार उपस्थित होते.

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहराचे सुपुत्र शहीद संजयसिंह राजपूत यांना 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी भ्याड हल्ल्यांमध्ये वीर मरण आले होते पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी 40 जवान शहीद झाले होते या चाळीस जवानांपैकी दोन जवान महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील होते बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील नितीन राठोड तर मलकापूर शहरातील संजय सिंह राजपूत या दोन विर जवानांचा यात समावेश होता. या घटनेला आज चार वर्षे पूर्ण झाली असून  आजही जिल्ह्यातच नव्हे तर देशात त्यांच्या आठवणीची ज्योत पेटत आहे.

त्यांच्या चतुर्थ स्मरणार्थ     श्रीमद् भागवत कथा व भव्य नामसंकीर्तन सप्ताहाचे सुध्दा आयोजन करण्यात आले होते. तर दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू झालेल्या या सप्ताहाचे आज 14 फेब्रुवारी 2022 रोजी काल्याचे किर्तन करीत महाप्रसादाने सांगता करण्यात आली. यावेळी सप्ताहाच्या ठिकाणी शहरवास यांनी शहीद संजय सिंह राजपूत यांना आदरणीय वाहण्याकरिता एकच गर्दी केली होती.


No comments:

Post a Comment