खासगावच्या उपसरपंच पदी शेख परविनबी शेख रशीद यांची निवड...
जाफ्राबाद : जाफराबाद तालुक्यातील आदर्श खासगाव येथे शुक्रवार रोजी उपसरपंच पदाची निवडणूक ग्रामपंचायत कार्यालय प्रांगणात पार पडली. यामध्ये परवीनबी शे. रशिद यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली. यावेळी नव निर्वाचितांचा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित संतोष लोखंडे, नवनिर्वाचित सरपंच रोहीणी चेतन लोखंडे, मंजुळाताई लोखंडे, ग्रा. पं. सदस्य लिंबाजी लोखंडे, चंद्रकला लोखंडे, रामकोरबाई लोखंडे, बेबाबाई कोल्हे, रुख्मीनाबाई लोखंडे, महेबुबखा पठाण, दिनकर कटक, शंकर हिवाळे, ज्ञानेश्वरी यदमाळ, शेख शाकीर शे. युसुफ, निवडणुक निरीक्षक बि. बी. जाधव, ग्रामविकास अधिकारी आर. बी. पिंपळे, मनोहर लोखंडे आदी गावातील प्रतिष्ठित नागरीक महीला व पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
No comments:
Post a Comment