बहुजन शक्ती सेनेच्यावतीने हीवळणी येथे कायम स्वरूपाच्या शिक्षकांची निवेदनाद्वारे मागणी

 


    प्रतिनिधी / स्वरूप सुरोशे :

 महागाव तालुक्यातील हिवळणी येथील जिल्हा परिषद शाळेवर कायम स्वरुपी शिक्षक नसल्याने 1 ते 4 या वर्गासाठी अनेक आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने हिवळणी येथे बहुजन शक्ती सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा केला आहे. हिवळणी येथील बहुतांश आदिवासी समाज प्रामुख्याने असून शासनाने आदिवाशी  समाजाच्या शिक्षण आणि सर्वांगीण विकास यावर भर दिला असून गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी दुर्लक्ष करणार नाहीत अशी अपेक्षा चिमुकल्या विद्यर्थ्यानी धरली आहे. हीवळणी जिल्हा परिषद एक ते चार या वर्गासाठी एकही शिक्षक नसल्याकारणाने विद्यर्थ्यांचे नुकसान होत आहे. बहुजन शक्ती सेनेने स्थाई शिक्षक द्या अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन अशा इशारा बहुजन शक्ती सेनेने दिला

No comments:

Post a Comment