केळणा व पूर्णा नदीच्या संगम मध्ये विद्यार्थ्यांची निसर्ग सहल रमली
आकाश बकाल
जाफराबाद तालुक्यातील गुलशन व फातेमाबी उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची आज दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी मुला मुलींची सहल जाफराबादच्या केळना / पूर्णा नदी मध्ये ज्या ठिकाणी सात नद्यांचा संगम होतो त्या ठिकाणी वर्ग पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींची सहल नेण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी या नदीत चांगलेच मनसोक्तपणे आनंद घेतले तसेच निसर्गरम्य वातावरणात मोठ्या प्रमाणात रमले होते. अनेक शिक्षकांनी या ठिकाणी वेगवेगळ्या निसर्गाबद्दल माहिती दिली. वेगवेगळे पक्षांबद्दल माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांना तहान लागली होती त्यासाठी शिक्षकांनी नदीमध्ये झिर्याचा वापर करून पाणी कशा प्रमाणे क्षार विरहित स्वच्छ होईल त्याची पूर्णपणे माहिती देऊन झिर्यातील चांगले पाणी पिण्यात आले.
विद्यार्थ्यांनी याचा चांगला अनुभव घेतला आणि एक नवीन उपक्रम या ठिकाणी शिक्षकाकडून राबविण्यात आला. त्याचप्रमाणे एक उसाचा शेत होते त्या ठिकाणी शेतकऱ्याची परवानगी घेऊन मनसोक्तपणे ऊस खाण्याचाही आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. नदीच्या काठावर बसून डब्बा पार्टी केली व तसेच नैसर्गिक वातावरणात वेगवेगळे खेळ खेळले. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसोबत कबड्डी खेळ खेळून विद्यार्थ्यांप्रमाणे खेळांमध्ये तेही रमले होते या वेळी फातेमाबी उर्दू माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शेख रहिम सर व गुलशनचे मुख्याध्यापक जे.बी. शहा,रफिक सर, विकार सर,मोबीन सर,असीम सर, नदीम सर,शहजाद सर,असगर सर,फरिदा बाजी,अलफीया बाजी, गजानन हरकळ,गणेश बरडे या आदींनी या निसर्ग सहलीसाठी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment