अपूर्ण अवस्थेत असलेल्या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटनेचे बोलठाण येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील संपूर्ण रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने दिनांक 16 जानेवारी 2023 पासून बेमुदत ठिय्या आंदोलन बोलठाण येथे सुरू करण्यात आले आहे..
नांदगाव तालुक्यातील घाट माथ्यावर संपूर्ण रस्त्याचे हे काम तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीसाठी आता बाहेरच्या वतीने बोलठाण येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले असून घटनास्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते किंवा उपाधी हे दाखल न झाल्याने संतप्त झालेल्या प्रहार संघटनेचे कार्यकर्ते संदीप सूर्यवंशी यांनी स्वतःला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गाडीला बांधून घेतले.
नांदगाव तालुक्यातील रस्त्याची कामे अर्धवट राहिले काही ठिकाणी रस्त्यांची अतिशय दैनिक अशी अवस्था झाली आहे. ज्येष्ठ नागरिक, वाहनधारक, शालेय विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागतो. यासाठी आता प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने बोलठाण येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलनाच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते किंवा उपाधी हे स्वतः हजर न राहता त्यांचे सहकारी यांना पाठवले होते. त्यामुळे प्रहार चे कार्यकर्ते संदीप सूर्यवंशी यांनी स्वतःला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गाडीला बांधून घेत अनोखे पद्धतीने आंदोलन केले.
सदरचे आंदोलन हे संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय आम्ही बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच राहील असे संदीप सूर्यवंशी यांनी बोलताना सांगितले.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग नांदगाव कार्यालयातील च़ोळके यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आम्ही आंदोलन करताना सांगितले होते की दोन दिवसात काम चालू करतो परंतु ते ऐकणे ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने आम्ही लगेच दोन दिवसात कामास सुरुवात करणार असल्याची माहिती बोलताना दिली.
No comments:
Post a Comment