जुगार खेळणारे सहा जण पकडले... जाफराबाद पोलिसांची कारवाई
जाफ्राबाद : जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक गावाच्या अलीकडे असलेल्या नाल्याजवळ जुगार खेळणाऱ्या सहा संशयितांना जाफराबाद पोलिसांनी ता.13 पकडले. त्यांच्याकडून तेरा हजार सातशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक गावाच्या अलीकडे असलेल्या नाल्याजवळजुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार जाफराबाद पोलिसांनी मंगळवारी या ठिकाणी छापा टाकला. त्यामध्ये संशयिताकडून पोलिसांनी सहा आरोपीकडून रोख रक्कम 13 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस कर्मचारी अनंत भुतेकर यांच्या फिर्यादीवरून जाफ्राबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Labels:
क्राइम
No comments:
Post a Comment