युडायस नोंदणीत जाफराबाद तालुका अव्वल



दर्पण प्रतिनिधी : जाफराबाद

    जालना : शालेय विद्यार्थी भौतिक सुविधा सह परिपूर्ण माहितीचा डाटा असलेली युडायस प्रणाली आहे. सदर कामकाजात जिल्ह्यात जाफराबाद तालुक्याचे काम सर्वात प्रगतीवर असून टक्केवारीत प्रथम असल्याचे शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे. 

शासनाच्या सर्व योजना या युडायसवर आधारित असतात. युडायस माहितीत वर्ग खोल्या,  स्वच्छतागृह,  किचन शेड,  पिण्याचे पाणी, विद्यार्थी संख्या त्यांना मिळणाऱ्या इतर सुविधा, खेळ साहित्य, संगणक, दिव्यांग विद्यार्थी,  आवश्यक व उपलब्ध शिक्षक संख्या इत्यादी माहिती शासन स्तरावर तात्काळ उपलब्ध होऊन विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीरित्या होण्यासाठी दरवर्षी शाळांनी युडायस माहिती भरणे बंधकारक असते. सदर माहिती भरण्यात जालना जिल्ह्यात जाफ्राबाद तालुका प्रथम क्रमांकावर आला आहे.

गटशिक्षणाधिकारी डॉ. भरत वानखेडे यांनी वेळोवेळी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांच्या नेहमी आढावा बैठका घेऊन यु डायस प्रणालीत माहिती भरण्यास मार्गदर्शन केल्याने काम पूर्ण झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जाफराबाद तालुक्यातील सर्व 233 शाळांनी युडायस प्रणालीत माहिती भरली आहे. विभागीय उपसंचालक अनिल साबळे, सहाय्यक उपसंचालक सिद्धेश्वर काळुसे, शिक्षण उपनिरीक्षक डॉ सतीश सातव, शिक्षणाधिकारी प्राथमिक कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी माध्यमिक मंगल धूपे यांनी जाफराबादचे गटशिक्षणाधिकारी डॉ भरत वानखेडे आणि सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती, मुख्याध्यापक यांचे  युडायस मध्ये केलेल्या कामाबद्दल अभिनंदन केले आहे

No comments:

Post a Comment