मलकापुरात होमगार्ड संघटनेची रॅली व स्वच्छता अभियान

 

होमगार्ड संघटनेच्या स्वच्छता अभियानात सहभागी होमगार्ड


     मलकापूर : होमगार्ड संघटनेच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त मलकापुरात रविवारी रैली काढण्यात आली. तसेच बसस्थानक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापुरात होमगार्ड संघटनेचा ७६ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. पोलिस ठाण्यातून सकाळी रॅली निघाली. नांदुरा रोड, तहसील चौक, बुलढाणा रोड, हनुमान चौक, संत गाडगेबाबा टी-पॉइंट मार्गाने बसस्थानकावर रॅलीचा समारोप करण्यात आला. त्यानंतर वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होमगार्ड बांधवांनी बसस्थानक परिसरात स्वच्छता अभियान राबविले.

No comments:

Post a Comment