जाफराबाद तालुक्यात 86.82 टक्के मतदान...

 सरपंचासाठी 145 तर सदस्यपदाच्या 765 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद


जाफ्राबाद प्रतिनिधी : तालुक्यातील 167 मतदान केंद्रात 71434 मतदारांपैकी 62 हजार एकोणीस मतदारांनी रविवारी तारीख 18 मतदानाचा हक्क बजावला आहे. 86.82 टक्के एवढे मतदान झाले आहे.

जाफराबाद तालुक्यातील १६७ मतदान मतदारांनी उत्साह तसेच शांततापूर्ण वातावरणात मतदानाचा हक्क बजावला. शिवाय टपाल मतपत्रिका देखील मतभेटीत टाकण्यात आल्या आहे. जाफराबाद तालुक्यातील 55 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी 145 आणि सदस्यांसाठी 765 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झाले आहे. आता मंगळवारी तारीख 20 मतमोजणीनंतर घोषित होणाऱ्या निकालाकडे तालुक्याचे लक्ष वेधले गेले आहे. जाफराबाद तालुक्यातील निमखेडा बुद्रुक येथे सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. 

                                                    

जाफराबाद तालुक्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी 800 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. जाफराबाद तालुक्यात विरोधी राजकीय पक्ष व्यतिरिक्त एकाच पक्षाच्या उमेदवारांनी परस्परांच्या विरोधात निवडणूक लढविली. तालुक्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी 800 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती जाफराबाद तालुक्यात विरोधी राजकीय पक्ष व्यतिरिक्त एकाच पक्षाच्या उमेदवारांनी परस्परांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीत 90% च्या वर मतदान झाल्याने लढती चुरशीच्या झाल्या आहेत.

No comments:

Post a Comment