254 ग्रामपंचायतीमधील प्रचार थंडावला...आता गाठीभेटींवर भर



जाफ्राबाद / जालना

ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शुक्रवारी थंडावल्या आहे. असे असले तरी उमेदवारांकडून आता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटीगाठीवर भर दिला जातअसल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत सरपंच पदासाठी थेट जनतेतून मतदान होणार असल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. रविवारी जवळपास 889 मतदान केंद्रावर हे मतदान होणार आहे.

जिल्ह्यातील बदनापूर तालुका वगळता परतूर  जाफराबाद भोकरदन परतुर  घनसावंगी जालना आणि मंठा तालुक्यांचा यात समावेश आहे. या सातही तालुक्यातील शनिवारी दुपारीच सर्व यंत्रणा मुक्कामासाठी जाणार असून त्यासाठी एसटी महामंडळाच्या बस तसेच खाजगी वाहनातून या अधिकारी कर्मचाऱ्यांना नेण्याची व्यवस्था केली आहे. 

दुसरीकडे मतदानाचा प्रचार गेले दहा ते बारा दिवस शिगेला पोहोचला होता तो शुक्रवारी सायंकाळी थंडावला. परंतु प्रचार निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जाहीर सभा आणि रॅली काढता येत नाहीत. परंतु वैयक्तिक भेटी परंतु वैयक्तिक भेठीगाठी भेटीवर बंधने नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या पॅनल प्रमुख तसेच सदस्यांनी सायंकाळ नंतर घरोघरी जाऊन भेटीगाठीवर भर देत विजय करण्याचे  आवाहन केले जात असल्याचे सांगण्यात आले.


No comments:

Post a Comment