महाराष्ट्रात महागाईचा दर इतर राज्यांपेक्षा अधिक; शहरी भागात महागाईची आकडेवारी चिंतादायक
देशात गेल्या वर्षभराहून अधिक कालावधीपासून महागाईने जनतेचे कंबरडे मोडले असल्याने सर्वसामान्यांना महिन्याचे आर्थिक बजेट सांभाळताना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे. नुकतीच देशातील घाऊक आणि किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती ज्यानुसार घाऊक महागाई महागाई काही प्रमाणात आटोक्यात आणण्यात यश मिळाले असले तरी सध्याच्या घडीला जनतेला हवा तसा महागाईतून दिलासा अद्यापपर्यंत मिळाला नसल्याचे चित्र आहे.किरकोळ महागाई दराची आकडेवारी तर रिझर्व्ह बँकेची चिंता वाढविणारी ठरली आहे, सरकारने सुरुवातीला घाऊक महागाई दराची आकडेवारी जाहीर केली होती तदनंतर नुकतीच किरकोळ महागाई दराची आकडेवारी जाहीर झाली आहे. एकंदरीत आकडेवारी बघता महाराष्ट्रात इतर राज्यांपेक्षा अधिक महागाई असल्याची बाब पुढे आली आहे, त्यामुळे हल्लीच्या राज्य सरकारकरिता ही चिंतनीय बाब आहे.आकड्यांवर नजर टाकली असता महाराष्ट्रात मागील ऑक्टोबर महिन्यात महागाईचा दर हा ७.२२ टक्के इतका होता ज्यामध्ये ग्रामीण भागात महागाई दर ६.९३ टक्के तर शहरी भागात ७.४१ टक्के होता. राष्ट्रीय पातळीवर सध्या महागाई कमी करण्यात केंद्र सरकारला अपयश आल्याचे चित्र आहे, याचाच परिपाक म्हणजे गेल्या सात ते आठ महिन्यात महागाई दर ७ टक्के पेक्षा कमी होऊ शकला नाही. देशात ऑक्टोबर महिन्यात महागाई दर कमी होऊन तो ६.७७ टक्क्यांवर आला होता.
सध्या केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेची चिंता यामुळे देखील वाढणार आहे की अजूनही महागाई दर ६ टक्क्यांपेक्षा कमी येऊ शकला नाही जो सध्याच्या अर्थव्यवस्थेच्या तसेच जनतेच्या दृष्टीने धोकादायक बाब आहे. याचे मुख्य कारण म्हणजे साधारणपणे सहा टक्क्यांपर्यंत महागाई दर सुसह्य ठरतो मात्र सध्याचे आकडे डोके चक्रावणारे आहे.सध्या केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेची चिंता यामुळे देखील वाढणार आहे की अजूनही महागाई दर ६ टक्क्यांपेक्षा कमी येऊ शकला नाही जो सध्याच्या अर्थव्यवस्थेच्या तसेच जनतेच्या दृष्टीने धोकादायक बाब आहे. याचे मुख्य कारण म्हणजे साधारणपणे सहा टक्क्यांपर्यंत महागाई दर सुसह्य ठरतो मात्र सध्याचे आकडे डोके चक्रावणारे आहे.
No comments:
Post a Comment