जाफराबाद - चिखली रस्त्याचे बेहाल वाहनधारकांना करावी लागते कसरत



दर्पण जाफ्राबाद : आकाश बकाल

        जाफराबाद मराठवाडा विदर्भाला जोडणाऱ्या ज्या जाफ्राबाद चिखली रस्त्यावर वरुड सह ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. मराठवाडा व विदर्भाला जोडणारा जाफ्राबाद ते चिखली रस्त्यावर नेहमीच मोठी वाहनांची वर्दळ असते. दरम्यान वरुड सह कोळेगाव कोनड या भागातील ग्रामस्थांना ज्यांना बाजारपेठ दूर आहे. त्यामुळे या ग्रामस्थांचा सर्व व्यापारी व्यवहार चिखली शहराशी जोडला गेलेला आहे. याशिवाय आरोग्याशी संबंधित सर्व उपचार या भागातील ग्रामस्थ चिखली येथे घेत असतात. त्यामुळे या रस्त्यावर मोठी रहदारी असते परंतु रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे ठीक ठिकाणी मोठे खड्डे पडलेले असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे या रस्त्याचे काम त्वरित करण्याची मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment