मोताळा तालुक्याचे ठाकरे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख व युवासेना उपजिल्हा प्रमुख यांचेवर भ्याड हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी

  


  मलकापुर:-  शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे साहेब यांची चिखली येथे २६ नोव्हेंबर २०२२ रोजी जाहीर सभा होत आहे. या अनुषंगाने बुलडाणा येथे नियोजन बैठक आयोजित केली होती. ही  बैठक झाल्यानंतर मोताळा तालुक्याचे तालुका प्रमुख अनंता दिवाणे व युवासेना उप जिल्हा प्रमुख शुभम घोंगटे हे दोघे आपल्या मोटारसायकलने घरी जात असताना या दोघांवरही प्राणघातक हल्ला झाला. ही घटना अतिशय निंदनीय असून हल्ला करणारे आरोपी यांना तात्काळ अटक करून कठोर शासन करावे अन्यथा जिल्ह्यात शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. 

  अश्या आशयाचे निवेदन उपविभागीय महसुल अधिकारी मनोज देशमुख यांना शिवसेना बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख  नरुभाऊ खेडेकर,सह संपर्कप्रमुख दत्ताभाऊ पाटील, जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंदाताई बढे, युवा सेना जिल्हाप्रमुख शुभम पाटील, उपजिल्हा प्रमुख रविंद्र भोजने, उपजिल्हा प्रमुख संजयसिंह जाधव, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापुर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनावर तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील,शहर प्रमुख गजानन ठोसर, कामगार सेना तालुकाप्रमुख रामभाऊ थोरबोले, शहरप्रमुख हरीदास गणबास, किसान सेना तालुकाप्रमुख महादेवराव पवार, युवासेना शहरप्रमुख पवन गरुड, शिवसेना उपशहरप्रमुख बाळुभाऊ पोलाखरे,विजय झांबरे, सचिन निळे, आकाश बोरले,हसन गौरी,मधुकर चित्रंग, गजानन झोपे, गजानन चिकटे, संतोष बोरले,सुरेश वाघ, विशाल फुकटे, विनोद कचरे, सुभाष कवळे, मोहम्मद जुनेद अब्दुल रसूल सह शिवसैनिकांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment