गावागावातून पुढे येत देशपातळीवर खेळावे
जाफ्राबाद
भारतात ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा गुण अधिक आहेत. गावखेड्यातील विद्यार्थ्यांनी क्रीडा गुणवत्तेच्या बळावर देशपातळीपर्यंंत नाव मोठे करावे असे आवाहन जाफराबाद ठाण्याचे पोलीस सहायक निरीक्षक राजाराम तडवी यांनी केले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना यांच्या मार्फत शालेय १४, १७ व १९ वर्ष वयोगटातील मुले, मुलींचे व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजन येथील सिद्धार्थ महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष प्राचार्य डॉ. शाम सर्जे यांनी सुद्धा खेळाडूंनी खेळाडूवृत्तीने खेळावे व खेळाडूमध्ये राष्ट्रीय एकात्मता जोपासली पाहिजे असे खेळाडूंना मार्गदर्शन केले.
यावेळी गट शिक्षण अधिकारी डाॅ. भरत वानखेडे, उपप्राचार्य डॉ. सुनील मेढे, उपप्राचार्य डॉ. रमेश देशमुख व तालुका क्रीडा संयोजक प्रा. वाहेद पटेल, तालुक्यातील क्रीडा शिक्षक व महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या व्हॉलीबॉल १२ विद्यालयाच्या संघाने भाग घेतला होता. १४ वर्षा आतील मुले, मुली जिल्हा परिषद माहोरा अजिंक्य पद पटकविले. यात जाफराबाद येथील राजमाता जिजाऊ विद्यालयातील १७ वर्षाखालील मुलांनी विजय संपादन केला तर १९ वर्षा आतील मुले मुली मध्ये कॅरम व व्हॉलीबॉल मद्ये सिद्धार्थ महाविद्यालयाने विजय संपादन केला. तसेच कॅरममध्ये जे. बी. के. विद्यालय टेंभुर्णी व राजे संभाजी विद्यालय जवखेडा ठेंग येथिल विद्यार्थ्यांनी यश संपादन केले या सर्व विद्यालयाची जिल्हा स्तरावर निवड झालेली आहे.
स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रा, उदय वझरकर प्रा, बावीस्कर, प्रा. सुनंदा सोनुने, अशोक कोल्हे, रमेश मुरकुटे, प्रा. अशोक आहीरे, प्रा. रवींद्र चवधरी व प्रा. भगवान गाढवे, प्रा. पांडे, दिलीप वाघ, स्वप्नील वाघ, श्रीकांत पारवे व संम्यक हिवाळे यांच्यासह आदींनी सहकार्य केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. अनिल वैद्य यांनी केले.
No comments:
Post a Comment