माहिती अधिकार कार्यकर्ते व पत्रकार संघटनेचा महाराष्ट्र राज्य मेळावा नेवासा विश्रामगृह येथे संपन्न



डॉ. विकास भागवत - ( नेवासा प्रतिनिधी ) 

 शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील माहिती अधिकार कार्यकर्ते व पत्रकार संघटनेचा नेवासा येथील विश्रामगृह येथे मेळावा संपन्न झाला ,नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात मुख्यालयी प्रश्नी सामाजिक कार्यकर्ते सोपान रावडे कायदेशीर मार्गाने आंदोलन करत असताना बेकायदेशीरपणे १०० ते १५० च्या जमावणे आंदोलनाचा राग धरून सोपान रावडे कुटुंबाला मारहाण केली आणि प्रशासनाने बेकायदेशीर कृत करणाऱ्या जमावर कुठलीही कार्यवाही न करता उलट राजकीय दबावापोटी व कुटील षडयंत्रातून सोपान रावडेलाच अटक केल्याने नेवासा तालुक्यात गुन्हेगाराला बेल तर निर्दोषाला जेल असा प्रकार निर्माण झालेला आहे ,

   नेवासा तालुक्यात रेशनचा काळ्याबाजारातील मोठा साठा पकडला , गोरगरिबांच्या  तोंडातील अन्नाचा काळाबाजार करणाऱ्या व त्यांना सामील होऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोड करणाऱ्यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली नाही का ? त्यातील पकडलेल्या इसमांना आठ दिवसाच्या आत बेल मिळते परंतु कुठलाच गुन्हा नसलेल्या सोपान रावडेला जेल ,

       खुद्द महसूल मंत्री वाळूच्या बोटी पकडून देतात , चोऱ्या , दरोडे , धमक्या , दादागिरी , दहशत यामुळे महाराष्ट्र राज्यात नेवासा तालुका चर्चेत आहे , महाराष्ट्र राज्यातील नगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यात सध्या कुणा गुंडाचा त्रास नसून शासनाच्या कर्मचाऱ्याकडून अन्याय अत्याचार होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे ,

नेवासा तालुक्यातील सामाजिक क्षेत्रातील व राजकीय क्षेत्रातील जनजागृती करणारे सामाजिक कार्यकर्ते माहिती अधिकार कार्यकर्ते तसेच सत्यासाठी आवाज उठवणाऱ्या इत्यादीवर भीतीचे व दहशतिचे वातावरण निर्माण करण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केली जातात , तेव्हा सामाजिक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण झपाट्याने वाढत चालल्याने सामाजिक कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी संघटित करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता , याची पहिली थिणंगी नेवासा तालुक्यात शेतकरी संघटनेचे नेवासा तालुकाध्यक्ष त्रिंबक भदगले यांच्या माध्यमातून टाकण्यात आली ,

     यावेळी दक्ष पत्रकार संघटक मराठवाडा पत्रकार सचिन मोईन , पत्रकारा रामकृष्ण भवर , माहिती अधिकार कार्यकर्ते नानासाहेब दुसिंग , नारायण मूर्तडक , संदीप जावळे , लोकदवंडी न्यूज संपादक विकास भागवत , पत्रकार कृष्णा गायकवाड , पांडुरंग ठोंबरे , रामदास रावडे , अण्णासाहेब कोकाटे , किसन शिंदे , अलका रावडे , मनसे तालुकाध्यक्ष मीराताई गुंजाळ , उपाध्यक्ष मुक्ताताई साळुंखे , अशोक नागवडे , बहिरु नेब  दत्तात्रेय निकम , संतोष अडसुरे , बाबासाहेब रावडे , गोरक्षनाथ साळुंखे , बाबासाहेब मोहिते , ज्ञानेश्वर रावडे , नामदेव रावडे , अश्विनी रावडे , आप्पासाहेब कोकाटे , योगिता रावडे , राधा रावडे , मंदा रावडे , नंदा रावडे , अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

No comments:

Post a Comment