वडनेर भोलजी येथे जनावरांवर आलेल्या लम्पी रोगाची लसीकरणास सुरुवात

 



नांदुरा.प्रतिनिधी, सिद्धार्थ तायडे, 

    दि. १४ सप्टेंबर रोजी ग्राम. वडनेर भोलजी येथील पशुवैद्यकीय श्रेणी- 2 दवाखान्यांमध्ये जनावरावर आलेल्या लम्पी स्किन या आजाराची प्रतिबंधक लसीकरण मोहीम ग्रामपंचायत वडनेर भोलजी सरपंच पती संतोष भाऊ डीघे  यांच्या विशेष सहकार्याने आणि गावातील  शेतकरी पशुपालक त्यांच्या मदतीने लसीकरणाला सुरुवात होऊन जवळपास चारशे च्या वरती जनावरांना लम्पी स्किन प्रतिबंधक लस देण्यात आली. 

    या संसर्गजन्य आजारामुळे गावातील सर्व पशुपालक चिंताग्रस्त होते. या आजारावर वेळीच प्रतिबंध बसावा म्हणून लसीकरणाची सातत्याने मागणी होत होती. पशुसंवर्धन विभागाने तात्काळ गावातील पशुसंवर्धन दवाखान्यात लसीकरण घेऊन शेतकऱ्याला दिलासा देण्याचे काम केल्यामुळे सरपंच पती संतोष भाऊ व  पशुधन विकास अधिकारी डॉ.  डी. बी राठोड साहेब यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या लसीकरण मोहीमेला डॉ .ऋषिकेश देशमुख ग्रा. सदस्य, डॉ. मयुर देशमुख, डॉ, महाकाळे डॉ, सय्यद , डॉ गौरव सातव ,विवेक माळी यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी माजी उपसरपंच बशीत जमदार, ग्राम विकास अधिकारी ठाकरे साहेब, ग्रामपंचायत सदस्य  संदीप पाटील यांच्यासह शेतकरी व पशुपालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


No comments:

Post a Comment