बावनबिर गावात पशुवैधकीय अधिक्षकांचे ग्रा.पं.व गावकर्‍यांकडून स्वागत



प्रतिनिधी संग्रामपुर

संग्रामपुर तालुक्यातिल जनावरांमध्ये लम्पी आजारांचा संसर्ग वाढत असल्याने इतर जनावरांनाही आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्याचा प्रसार वाढू नये म्हणून आजारी जनावरांसाठी लस उपलब्ध करण्यात आली आहे.ठिकठिकाणी लसीकरण मोहीम सुरु आहे.गावातिल प्रत्येक नागरीकांनी आपल्य‍ा आजारी जनावरांना ही लस देऊन जनावर‍ंना कोरोना सारखे कॉरंटाईन ठेवावे.अशी माहिती जिल्हा पशुवैधकीय अधिक्षक लोणे यांनी पशुपालक व शेतकर्‍यांना दिली आहे.या रोगाचा प्रसार बावनबिर,वरवट बकाल,पंचाळा,पातुर्डा,चागेफळ,

खिरोडा,सावळा,पळशी झाशी इत्यादी गावात झालेला आहे.व काही गावांमध्ये या आजाराने बैलांचा मृत्यु देखील झालेला आहे. लम्पी सारख्या आजार आटोक्यात आणण्यासाठी ११ सप्टेंबर रोजी तालुक्यातिल बावनबिर ग्राम पंचायतला भेट दिली, व पशुपालक व शेतकर्‍यांना लम्पी आजाराची लक्षणे व त्यावर उपाय योजना, काळजी कशी घ्यावयाची इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात आले.आजारी जनावरांना स्पर्श करु नये, कोणत्याही आजारी जनावरांचे मास खाऊ नये,आज पर्यंत हा आजार बकरी व बोकळ्याध्ये नसल्याचा सांगण्यात आले.आजाराची लागण झालेल्या जनावरांसाठी बावनबिर येथे ४०० गोट पाक्स नावाची लस उपलब्ध करण्यात आलेली आहे.यावेळी ग्राम पंचायतच्या वतिने सरपंच गजानन मनसुटे व जिल्हा कॉंगेस कमिटीचे सरचिटणीस संजय ढगे, सुरेश हागे यांनी लोणे साहेबांचा सत्कार केला.यावेळी गावातिल योगेश पुंडे,विजय शेगोकार,शेख.सलमान, शेख सुलतान,भास्कर इलामे,शेख साबीर,गजानन पाटिल,दामू भगत,संदिप हागे,शैलेश शिरसाट,श्रीधर मुरुख,विजय सोळंके आणि पशुपलाक मोठ्या संख्याने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment