'म्हसळा नगरपंचायतीच्या उप नगराध्यक्ष पदाचा राखी करंबे यांनी स्वीकारला पदभार'

 


( वैभव कळस )

 म्हसळा नगरपंचायतीच्या उप नगराध्यक्ष पदी सौ. राखी अजय करंबे यांची बिनविरोध निवड झाली आहे. एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने ही निवडणूक आधीच बिनविरोध होणार हे निश्चित झाले होते. आज दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी तहसीलदार तथा पीठासीन अधिकारी यांनी अधिकृतपणे त्यांच्या नावाची घोषणा केली.

यावेळी झालेल्या पदभार स्विकार सोहळ्यात शिवसेनेचा भगवा वादळासारखा उपस्थित होता. लोकसभा संपर्क प्रमुख अनिल नवगणे, जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, युवासेना जिल्हाधिकारी विपुल उभारे, जेष्ठ नेते रवींद्र लाड, बाळा म्हात्रे, तालुका प्रमुख अमित महामुणकर, माजी सभापती महादेव पाटील,माजी तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले, माजी नगराध्यक्ष असहल कादिरी, नगरसेवक नासिर मिठागरे, निकेश कोकचा, सुफियान हळदे, माजी उप नगराध्यक्षा कमल जाधव, महिला तालुका प्रमुख गौरी करडे यांच्यासह शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडीनंतर आमच्या प्रतिनिधिशी बोलताना नवनिर्वाचित उप नगराध्यक्षा राखी करंबे यांनी सांगितले कि पक्षश्रेष्ठीनी माझ्यावर टाकलेला विश्वास मी निश्चितपणे सार्थ ठरवेन. पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली शहराची विकासकामे माझ्या सहकाऱ्यांच्या संमतीने पारदर्शकपणे करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


फोटो -म्हसळा नगरपंच्यातीच्या उपनगराध्यक्ष पदी शिवसेनेच्या सौ. राखी करंबे यांची बिनविरोध निवडझाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना लोकसभा संपर्क प्रमूख अनिल नवगणे सोबत जिल्हा जिल्हा प्रमूख प्रमोद घोसाळकर (छाया -वैभव कळस )


No comments:

Post a Comment