मूर्तिजापूर येथे 'विघ्नहर्ता दातांचा दवाखाना'चे उद्घाटन उत्साहात संपन्न
प्रतिनिधी गजानन चव्हाण
मूर्तिजापूर,रविवार दि.02/08/2026 रोजी शहरातील कोकणवाडी रोड, कृष्णा टॉवर, मूर्तिजापूर हायस्कूलजवळ दंतशल्यचिकित्सक डॉ. आशुतोष गजानन सारसे (Dental Surgeon) यांच्या 'विघ्नहर्ता दातांचा दवाखाना' या अत्याधुनिक दंतचिकित्सा केंद्राचे उद्घाटन रविवार सकाळी ११ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या सोहळ्याचे डॉ. हरीश पातोंड (MBBS, M.S. General Surgeon, DNB), डॉ. प्रशांत अघावते (MBBS, M.S. General Surgeon),यांच्या शुभ हस्ते उदघाट्न करण्यात आले कार्यक्रमाला श्री. प्रा. क्षेमेश राऊत, श्री. प्रा. पवन राऊत, श्री. मनीष शिरसाट, सौ. जया शिरसाट, श्री. मयूर शिरसाट, डॉ. प्रियंका शिरसाट तसेच डॉ. तुषार गजानन सारसे (B.H.M.S.) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी दवाखान्यात रूट कॅनल उपचार, किडलेले दात काढणे, पूर्ण व अर्धवट कवळी बसविणे, पक्के दात बसविणे, दात स्वच्छ करणे, वाकडे दात सरळ करणे, लहान मुलांच्या दातांवरील उपचार तसेच दातांच्या सर्व प्रकारच्या आजारांवरील उपचार व औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
उद्घाटन सोहळ्यास नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार व मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. आशुतोष सारसे यांना शुभेच्छा दिल्या. नवीन दवाखान्यामुळे मूर्तिजापूर व परिसरातील नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार दंतोपचार सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.कार्यक्रमासाठी जानराव सारसे,, श्रीकृष्ण सारसे डॉ.आशुतोष चे वडील गजानन सारसे आई संगीता सारसे,शाळेचे सोळंके सर सोबतच सालतवाडा गावचे ग्रामपंचायत सदस्य प्रदीप वानखडे, गजानन चव्हाण जवळा येथील प्रमोद गावंडे हे उपस्थित राहून डॉ आशुतोष यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,कार्यक्रमाचे आयोजन सारसे परिवाराच्या वतीने करण्यात आले असून, उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

No comments:
Post a Comment