'नाईक-अंतुले महाविद्यालयात क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती उत्साहात साजरी
(वैभव कळस )
कोकण उन्नती मित्र मंडळ मुंबई माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांनी स्थापन केलेल्या वसंतराव नाईक कला,वाणिज्य आणि बॅरिस्टर ए.आर.अंतुले विज्ञान महाविद्यालयात विकास समिती अध्यक्ष तथा माजी आमदार मुस्ताक अंतुले यांच्या मार्गदर्शनात क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या प्रसंगी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य दिगंबर टेकळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या वेळी शिक्षकशिक्षकेतर कर्मचारीवर्ग व विद्यार्थी यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.सांस्कृतिक विभागाकडून आयोजित केलेल्या जयंती कार्यक्रमाचे विभाग प्रमुख प्रा.रायप्पा माशाळे यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना सांगली जिल्ह्य़ातील छोटेसे गाव येडेमच्छिंद्र येथे नाना पाटील यांचा जन्म झाला.
सुरूवातीला महसूल विभागात तलाठी म्हणून नोकरी करतानाच त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली आणि देशातील देश भक्तीने प्रेरित झालेल्या तरूणांना एकत्र करून ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला.हे करत असताना त्यांनी समांतर सरकार सुरू केली त्याला "पत्री सरकार"असे म्हणतात.यामध्ये सातारा,सांगली,कोल्हापूर या परिसरातील महिला सहभागी झाल्या होत्या.ब्रिटीशांची अटक सत्र सुरू असताना महिनोंमहिने भूमिगत राहून लढले.एकूणच त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीचे कार्य स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात ठळकपणे नोंद घेण्यासारखे होती. या जयंतीला शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,बहुसंख्य विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

No comments:
Post a Comment