श्री आईबाबा बहुउद्देशीय संस्था, सालतवाडा यांच्या वतीने साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन..

 


प्रतिनीधी गजानन चव्हाण 

मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम सालतवाडा येथे लोकशाहीर साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती निमित्त श्री आईबाबा बहुउद्देशीय संस्था, सालतवाडा यांच्या वतीने कर्मयोगी गाडगे महाराज चौकात प्रेरणादायी अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला गावातील नागरिक, युवक, समाजबांधव, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला विनम्र अभिवादन केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. प्रभुदास महाराज तर प्रमुख पाहुणे  जि. प.शाळेचे मुख्याध्यापक गजानन सारसे सर, डाबेराव सर,सोळंके सर  होते.

आपल्या भाषणात डाबेराव सर म्हणाले की, "लोकशाहीर साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी वर्गाच्या जीवनाला न्याय देण्याचे कार्य केले. त्यांचे विचार समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारे असून प्रत्येकाने त्यांच्या विचारांचा आदर्श जीवनात अंगीकारावा.त्यांनी विद्यार्थ्यांना डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेऊन शिक्षणाच्या बळावर समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे आवाहन केले. डॉ. साठे यांचे साहित्य हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले.  सामाजिक ऐक्य, शिक्षण आणि मानवतेची मूल्ये जपण्यासाठी त्यांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी दिलीप चिंचे, बाळू वानखडे, संतोष चिंचे, ज्ञानेश्वर वानखडे, महेंद्र तायडे, अमोल सहारे, दिवाकर नागे, रुपेश गावंडे, शिवा तवर, अमोल तायडे, अजय दांडगे, ओम वानखडे, ओम मोरे, यश वानखडे, श्रेयश चव्हाण यांच्यासह गावातील अनेक नागरिक, युवक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अजय दांडगे, ओम वानखडे आणि यश वानखडे, गजानन चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष श्री गजानन चव्हाण यांनी केले, तर डाबेराव सर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.


No comments:

Post a Comment