अयोध्या नगर येथे उत्साहात वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संकल्प

 


दर्यापूर ग्रामीण प्रतिनिधी दिपक मेश्राम 

​दर्यापूर: येथील अयोध्या नगर परिसरामध्ये पर्यावरण संतुलनाचा संदेश देत उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. पावसाळ्याचे औचित्य साधून परिसरातील नागरिकांनी एकत्र येत विविध वृक्षांची लागवड केली व त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली.

​याप्रसंगी शरदभाऊ सहगल, दीपक मेश्राम, देवेंद्र आपोतिकार, हरिभाऊ पवार, अंजली सहगल, पूर्वा मेश्राम, नित्याश मेश्राम, सौ. तेजस्विनी मेश्राम, सौ.ज्योतीताई सहगल आणि येवले काका प्रामुख्याने उपस्थित होते.

​"केवळ वृक्ष लावणे पुरेसे नसून, ते जगवणे ही काळाची गरज आहे," अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. परिसरातील इतर नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

No comments:

Post a Comment