मौजे दिंडेवाडीचे सुपुत्र प्रा. डॉ. पी. आर. फराकटे यांची सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी नियुक्ती
पत्रकार संभाजीराव सूर्यवंशी
पिंपळगाव प्रतिनिधी: मौजे दिंडेवाडीचे सुपुत्र तथा सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. पी. आर. फराकटे यांची महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी संस्थेचे कार्यवाह श्री. अण्णासो थोरवत यांच्या हस्ते प्रा. डॉ. फराकटे यांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे, स्टाफ सेक्रेटरी प्रा. डी. ए. सरदेसाई तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
मौजे दिंडेवाडीच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रासाठी ही नियुक्ती अभिमानाची बाब मानली जात असून, प्रा. डॉ. पी. आर. फराकटे यांच्या उपप्राचार्यपदी झालेल्या निवडीबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पुढील प्रशासकीय व शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.

No comments:
Post a Comment