इंदापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदसाठी निवेदन
दर्पण न्यूज इंदापूर तालुका प्रतिनिधी:- अंकुश भोसले
इंदापूर : नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर-मंतर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि अत्याचाराचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी इंदापूर तालुक्याच्या वतीने इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. तसेच इंदापूर तहसील कार्यालयातही महाराष्ट्र बंदच्या समर्थनार्थ निवेदन सादर करण्यात आले.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध करण्यात आला असून, आंदोलक विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि लाठीचार्जच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी बहुजन वंचित आघाडीचे इंदापूर तालुक्याचे कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment