'जीवनात कितीही मोठे झालो तरी देशाचा अभिमान राखणे अत्यावश्यक '.- जि. प. सदस्य अभिषेक विचारे




फोटो -खास. सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसाच्या पुर्वसांधेला न्यू इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप करताना मान्यवर. (छाया -वैभव कळस )

 मतदारसंघात सन २००९ पासून लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले खास. सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच मंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या सहकार्याने शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, आरोग्य आणि विविध लोकपयोगी विकासकामांना मोठी चालना मिळाली आहे. विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात झालेल्या भरीव कामांमुळे म्हसळा तालुक्यात प्रगतीचे नवे दालन खुले झाले असून तालुक्याच्या विकासात त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा न्यू इंग्लिश स्कूलचे चेअरमन समीर बनकर यांनी केले. जि. प. सदस्य अभिषेक विचारे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले कि प्रत्येक विद्यार्थ्याने जीवनात यशस्वी होण्याचे स्वप्न बाळगले पाहिजे. 

त्याचबरोबर आपल्या आई -वडिलांचा मान आणि संस्कार जोपासणे हे आपले प्रथम कर्तव्य मानले पाहिजे. त्याच प्रमाणे आपण कितीही मोठा झालो तरी देशाचे ऋण कधीही विसरता कामा नये हे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला न्यू इंग्लिश स्कूल, म्हसळा येथे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच भास्कर दाजी विचारे फाउंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य अभिषेक विचारे यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वितरण करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अभिषेक विचारे, जिल्हा परिषद सदस्य अनिल बसवत, पंचायत समिती सभापती बबन मनवे आणि प्राचार्य धर्मराज पाटील यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या विकासकामांचा गौरव करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास उपसभापती लहू म्हात्रे, पंचायत समिती सदस्या प्रियंका निंबरे व समृद्धी चाचले, माजी सभापती संदीप चाचले, सतीश शिगवण, मोरेश्वर पाटील, नाना सावंत, महेश घोले, किरण पालांडे, नगरसेविका जयश्री कापरे, सरपंच कविता पेरवी, गजानन पाखड, मधु पाटील तसेच शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत मोरे यांनी केले.


No comments:

Post a Comment