येणेगुर येथे एकल महिला निवारण कार्यक्रमाचे आयोजन विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा निर्धार



उमरगा तालुका प्रतिनिधी 


 आज दिनांक 23 जुन रोजी येणेगुर ग्रामपंचायत कार्यालय येथे गावातील  एकल महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक, सामाजिक तसेच कायदेशीर अडचणी सोडवण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालयाच्या शासन परि पत्र कास अनुसरून, येणेगुर ता. उमरगा येथे महिला व बालकल्याण विकास मंत्रालय मंत्री आदिती ताई तटकरे यांच्या परिपत्रकानुसार येणेगुर गावात एका विशेष निवारण कार्यक्रमाचे व बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, अंगणवाडी सेविका आणि महिला बचत गटांच्या प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदवला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शासन परिपत्रकात (जीआर) नमूद केल्यानुसार, एकल महिलांच्या (विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि अविवाहित) समस्या गाव आणि प्रभाग पातळीवर सोडवण्यास वर भर देण्यात आला. बैठकीत प्रामुख्याने एकल महिलांना श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, घरकुल योजना प्रदान मंत्री आवास योजना माहितीसाठी  आणि अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळवून देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.अनेक एकल महिलांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे त्यांना लाभापासून वंचित राहावे लागते, ही बाब यावेळी निदर्शनास आणून देण्यात आली. त्यावर तोडगा म्हणून ग्रामपंचायत अधिकारी श्री एल जी कांबळे यांनी ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करून महिलांचे उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले आणि रेशन कार्ड यांसारखी आवश्यक कागदपत्रे तातडीने पूर्ण करून देण्याची मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.याप्रसंगी बोलताना स्थानिक महिला प्रतिनिधींनी व गावचे प्रथम नागरिक  सरपंच रेखाताई गुंजोटे एकल महिलांचा सन्मान राखण्यासाठी गाव पातळीवर विशेष ग्रामसभा चे आयोजन करून त्यांना शासकीय योजनांमध्ये प्राधान्य देण्याची हमी देण्यात आली व गावातील अशा कार्यकर्ते यांना एकल महिलांची यादी संकलन करून ग्रामपंचायत मध्ये आठ दिवसाच्या आत सादर करण्याचेही माहिती देण्यात आले केली. या कार्यक्रमास गावातील महिला, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य माझी उपसरपंच बाबासाहेब गायकवाड विश्वनाथ गुंजोटे सिद्धेश्वर हिप्परगे तंटामुक्त उपाध्यक्ष कर्मचारी सचिन, खुर्शीद, सोनू, कुमार,आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व एकल महिलांना शासकीय योजनांची माहिती देणारे पत्रकं वाचन करण्यात आली. अशा प्रकारच्या निवारण बैठका महिला व बालविकास आयुक्तालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महानगरपालिका व नगरपालिका स्तरावरही टप्प्याटप्प्याने राबविल्या जातील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.



No comments:

Post a Comment