अतिशय कडक उन्हाळ्यातही मुळा धरणाचे पाणी नेवासा तालुक्यात उपलब्ध- आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांचे सातत्याचे प्रयत्न



आ. लंघे यांच्या पुढाकाराने पाटपाण्याचे यशस्वी नियोजन मंत्री विखे पाटील यांचे मोलाचे सहकार्य 

 दर्पण न्यूज:- नेवासा प्रतिनिधी  नाथाभाऊ शिंदे पाटील 

.   यंदाचा पावसाळा लांबणीवर गेल्याने नेवासा तालुक्यात शेतीला पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष सहकार्यामुळे मुळा धरणाच्या पाण्याचे रोटेशन नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आले.

अतिशय कडक उन्हाळ्याच्या परिस्थितीतही तालुक्यातील सर्व भागातील शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेसे सिंचनाचे पाणी उपलब्ध झाल्याने हजारो एकरांवरील खरीप, ऊस व इतर पिकांना मोठा दिलासा मिळाला. मुळा उजवा कालव्याच्या सिंचनाखाली नेवासा तालुक्यातील सुमारे ६० ते ७० टक्के क्षेत्र येते. या क्षेत्रामधील अंतिम टोकावरील वाकडी, शिरजगाव, सुकळी, वडूले, सलाबतपूर, गोपाळपूर, खडका, जळके, तामसवाडी, सोनई, करजगाव, खरवंडी, उस्थळ दुमला, तरवडी, कुकाणा आणि चिलेखनवाडी या गावांनाही यंदा चांगल्या प्रकारे सिंचनाचे पाणी मिळाले. शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आ. लंघे यांनी शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडली व आवर्तन सुरु राहिले.


No comments:

Post a Comment