'कुणबी समाज ठाकरोली विभाग मुंबई छत्री वाटपातून समाज बांधवांजवळ साधला संवाद'.
(वैभव कळस )
युवकांनी हाती घेतलेला पुढाकार कौतुकास्पद विभाग अध्यक्ष - मोहन शिंदे
३१ जून २०२६ रोजी कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका म्हसळा ठाकरोली विभाग मुंबई संलग्न युवक मंडळ व क्रीडा मंडळ यांच्या वतीने समाजासाठी सामाजिक बांधिलकी जपत एक घर एक छत्री अभिनव उपक्रम हाती घेत शुभारंभ कार्यक्रम कोलवट या ठिकाणी कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला उपस्थित. ठाकरोली विभाग अध्यक्ष नथुराम भुवड, कुणबी संघाचे उपाध्यक्ष बबन उंडरे, माजी अध्यक्ष दिलीप मांडवकर, सल्लागार शंकर तिलटकर, दक्षिण विभाग ग्रामीण मोहन शिंदे, सेक्रेटरी राजाराम तिलटकर, सल्लागार तथा उपाध्यक्ष अनिल बांद्रे, सह सेक्रेटरी मनोज मोरे, युवक अध्यक्ष विजय काप, सह सेक्रेटरी गणेश शिगवण, विभाग सेक्रेटरी सदानंद आग्रे, सह सेक्रेटरी दिनेश पाडावे, सल्लागार अंकुश कांबळे , खजिनदार रामचंद्र खेरटकर, प्रचारक महेंद्र घडशी , सल्लागार संतोष घडशी, माजी अध्यक्ष रमेश शिंदे, सचिव प्रशांत घडशी , सदस्य विशाल मांढरे, जितेंद्र वाघे, नथुराम काताळे, किशोर गुलगुले, राजाराम शिंदे,मंगेश आग्रे, गोविंद मोरे, शुभाष जाधव अनंत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रत्येक गावचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आवर्जून उपस्थित होते.
विभागातील वीस गावे कोलवट, तोराडी,पाणदरे पागळोली,कुडगाव, पाष्टी, ताम्हणे करंबे वाडी, रातिवणे ताम्हणे करंबे, चिरगाव सडकेची वाडी,धरणाची वाडी, बागेची वाडी, भापट, श्रीकृष्ण वाडी, सांगवड, ठाकरोली, न्यू अनंत वाडी, कोकबल, रूद्रवट, चिराठी इत्यादी गावातून १४०० छत्र्या वाटप करण्यात आल्या, यावेळी वाडी वस्ती वरती प्रत्यक्ष जाऊन लोकांजवळ सामाजिक संवाद साधण्यात आला. जेष्ठ समाजसेवक बबन उंडरे साहेब यांनी सामाजिक उपक्रमाचे महत्व थोडक्यात विषद केले, ठाकरोली विभाग मुंबई यांनी राबवलेल्या छत्री वाटप कार्यक्रमाचे ग्रामीण अध्यक्ष श्री मोहन शिंदे साहेब यांनी भरभरून कौतुक केले. ठाकरोली विभाग मुंबई चे मार्गदर्शक राजू जाधव व उपाध्यक्ष संदीप मोरे यांनी शुभेच्छा दिल्या.
वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष नथुराम भुवड यांनी केले, सुत्रसंचलन गणेश शिगवण यांनी केले तसेच आभार युवक अध्यक्ष विजय काप यांनी केले.

No comments:
Post a Comment