शेत-पाणंद रस्ते योजना समितीवर उद्धवराव लंके यांची नियुक्ती...!



सुरेंद्र सोनवणे,लोणी

प्रतिनिधी : लोणी येथील माजी सरपंच व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उद्धवराव लंके यांची महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजना अंतर्गत आंबेगाव विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीवर शेतकरी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्तीमुळे लोणी-धामणी परिसरासह आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने काम करणाऱ्या लंके यांना मिळालेली ही जबाबदारी शेतकरी वर्गासाठी लाभदायक ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, त्यांच्या नियुक्तीबद्दल परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


No comments:

Post a Comment