जि. प. शाळा येणेगुर येथे उत्साहात रंगला शाळेचा पहिला दिवस नवोदित विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत



उमरगा तालुका (प्रतिनिधी)

आज दिनांक 15/06/2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येणेगुर येथे आज नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नवोदित विद्यार्थ्यांचे अतिशय उत्साही आणि कौतुकास्पद वातावरणात स्वागत करण्यात आले. तब्बल दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्ट्यांनंतर शाळा पुन्हा सुरू झाल्याने शालेय परिसर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने आणि उत्साहाने गजबजून गेला होता.हर्षोल्हासात स्वागत आणि पहिल्याच दिवशी शाळेत येणाऱ्या पहिलीच्या आणि नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण शालेय परिसराला आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळी साडेआठ वाजता सर्व शिक्षक आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत गावात प्रभात फेरी विद्यार्थ्यांची वाजत-गाजत गावात प्रभात फेरी व स्वागत रॅली काढण्यात आली. शाळेच्या प्रवेशद्वारावर शिक्षिकांनी नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण करून, गुलाबपुष्प देऊन आणि पेढे भरवून त्यांचे शाळेत स्वागत केले.पाठ्यपुस्तके आणि खाऊचे वाटपशाळेच्या प्रांगणात आयोजित स्वागत समारंभाप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पहिलीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत मिळणारी नवीन कोरी पाठ्यपुस्तके आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. पहिल्याच दिवशी मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. तसेच सर्व विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने गोड खाऊचे वाटप करण्यात आले.मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला येणेगुर पंचायत समिती सदस्या लक्ष्मी काकु व तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, ज्ञानेश्वर माने स्थानिक लोकप्रतिनिधी सागर पाटील, पालक मुख्तार मुल्ला दिलीप गायकवाड इस्माईल मुल्ला, नितीन व्हनाळे व इतर पालक वर्ग तसेच शाळेचे मुख्याध्यापक कांबळे गुरुजी व सर्व शिक्षक उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या आणि जिल्हा परिषद शाळेतील गुणवत्तेवर विश्वास ठेवून पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश या सरकारी शाळेत निश्चित केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.मुख्याध्यापकांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेच्या वतीने वर्षभरात राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली व नियमित उपस्थितीचे आवाहन केले. व कार्यक्रमाची उपस्थित मान्यवराचे आभार अंबुसे गुरुजी मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. पहिल्याच दिवशी झालेल्या या सुंदर स्वागतामुळे विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस अत्यंत आनंददायी आणि संस्मरणीय ठरला.

No comments:

Post a Comment