निफाड तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रियेला वेग;



  दि १० ते दि १२ जून दरम्यान वार्डनिहाय आरक्षण सोडतीसाठी विशेष ग्रामसभा

प्रतिनिधी गणेश ठाकरे लासलगाव  :- 

राज्यातील मुदत संपलेल्या, डिसेंबर २०२६ पर्यंत मुदत संपणाऱ्या तसेच प्रशासक राजवट असलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली असून, निफाड तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींसाठी वार्डनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासंदर्भात तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी आदेश जारी केले आहेत.

        राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. १० ते दि १२ जून दरम्यान विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार असून, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच महिलांसाठीच्या आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. विशेष ग्रामसभांसाठी कोरमची आवश्यकता नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. आरक्षण सोडतीमुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

       निफाड तालुक्यातील मरळगोई खुर्द, मरळगोई बु./गोळेगाव, पाचोरे खुर्द, पाचोरे बु./शिवापूर, तळवाडे, थेरगाव, विष्णूनगर, कानळद, नारायण टेंभी, गोरठाण, कुरुडगाव, देवपूर, दिंडोरी तास, कुंदेवाडी, सारोळे खुर्द, शिंपीटाकळी, तामसवाडी, वेळापूर, कुंभारी, पंचकेश्वर, सारोळे थडी, धारणगाव खडक, हनुमाननगर, जिव्हाळे, लालपाडी/चेहडी खुर्द, शिवरे, वर्हेदारणा, श्रीरामनगर, डोंगरगाव, पाचोरेवणी, मौजे सुकेणे, चितेगाव, रौळस, आहेरगाव, चाटोरी, देवगाव/महादेवनगर, खेडे, कोठुरे, लासलगाव, म्हाळसाकोरे, नैताळे/रामपूर, रानवड, टाकळी विंचूर, पिंपळगाव नजीक, गाजरवाडी, खेडलेझुंगे, मुखेड, नारायणगाव, रुई/धानोरे, सावरगाव, सोनगाव, वाहेगाव/दहेगाव, वावी, विंचूर/विठ्ठलवाडी, वाकद, उंबरखेड, वडाळीनजीक, करंजगाव, नांदूरखुर्द, नांदूरमध्यमेश्वर, पिंपळगाव निपाणी/सावळी, सायखेडा, उगाव, भेंडाळी, बेहेड, भुसे, गोंदेगाव, एकलहरे, नांदगाव, दारणासांगवी, कोळगाव, रसलपूर, शिरसगाव, शिरवाडे वाकद, शिरवाडेवणी, सोनेवाडी बु., सुंदरपूर, वनसगाव, ब्राह्मणगाव विंचूर, भरवस/मनोरी खुर्द, ब्राह्मणगाव वनस, दात्याने, दावचवाडी, कारसूळ, महाजनपूर, पिंपरी, रामनगर (बेरवाडी), शिवडी, रेडगाव बु., आंतरवेली, चापडगाव, करंजी खुर्द/ब्राह्मणवाडे, सुभाषनगर तसेच औरंगपूर/श्रीरामपूर या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

         सदर आरक्षण प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसील प्रशासनाने मंडळ अधिकारी शशिकांत विधाते, जयंत लिलके, आश्विनी भोसले, डी. बी. केसरे, सतीश बोडके, गोविंद काळे, रुपाली सावळे, संतोष डुंबरे, प्रमोद रणदिवे यांच्यासह विस्तार अधिकारी गौरव हिरे, विनोद साबळे, राजेश थोरात, प्रशांत बोरस्ते तसेच कृषी विभागाचे जनार्दन क्षिरसागर, राहुल धनगर आणि मनोज रोंगटे यांची अध्यक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

• इच्छुकांची धाकधूक वाढली; मोर्चेबांधणीला सुरुवात

गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त असल्याने गावगाड्याचा कारभार संथ गतीने सुरू होता. आता प्रभागनिहाय आरक्षणाची तारीख निश्चित झाल्यामुळे आपला प्रभाग कोणत्या वर्गासाठी आरक्षित होणार याकडे विद्यमान सदस्य, माजी पदाधिकारी आणि नव्या इच्छुकांचे लक्ष लागले आहे. आरक्षण जाहीर होताच गावागावांत पॅनेल निर्मिती, गुप्त बैठका आणि उमेदवारीच्या चाचपणीला वेग येणार असल्याचे चित्र आहे.


• असा असेल कार्यक्रम

दि.८ जून - विशेष ग्रामसभेची नोटीस प्रसिद्ध

दि.१२ जून - विशेष ग्रामसभेत प्रत्यक्ष प्रभागनिहाय आरक्षण सोडत

दि. १७ जून - आरक्षण प्रारूप अधिसूचनेस जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता

दि.१९ जून - प्रारूप आरक्षण प्रसिद्धीकरण

दि.१९ ते २५ जून - हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत

दि.३ जुलै पर्यंत - हरकतींवर अभिप्राय

दि.८ जुलै - अंतिम अधिसूचनेस मंजुरी

दि.१० जुलै - अंतिम प्रभागरचना व आरक्षण अधिसूचना प्रसिद्ध


No comments:

Post a Comment