जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल प्रेमी चा सत्कार व सायकल रॅली .

 


प्रतिनिधी गजानन चव्हाण 

 दर वर्षी प्रमाने या हि वर्षी मेरा युवा भारत केंद्र , अकोला युवा  कार्यक्रम एव खेल मंत्रालय भारत सरकार संचालित नेहरू युवा बहू क्रिडा व सांस्कृतिक  मंडळ कोकणवाडी  मुर्तिजापुर कृष्णा कामिनी क्रीडा प्रसारक संस्था व  सिटी टायकान्डो क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 3 जून जागतिक सायकल दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तालुका क्रीडा संकुल पर्यंत शहरातून सायकल  रॅली काढण्यात आली युवा उद्योजक समाजसेवक श्री प्रशांत भाऊ हजारे यांनी सदर रॅली ला हिरवी झेंडी दाखवून मोठ्या उत्साहाने सायकल रॅलीस  सुरुवात करण्यात आली प्रमुख उपस्थिती मध्ये प्रशांत भाऊ हजारी हम्राहिम भाई घानीवाला  रमेश दर्यानी सुनील भोजगडिया विनोद काळबांडे ज्ञानेश ताले  रवि चव्हान मीना बोंडे विष्णू लोडम रमेरा तोडले  गांधी साहेब  सोहम सरोवरे अविनाश यावले  सचिन बोनगिरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली रॅलीमध्ये लहान चिमुकल्या पासून तर 70 वर्षाच्या वयोवृद्धांनी आपला सहभाग  नोदविला अक्षय निपाने  सर जिल्हा युवा अधिकारी  मेरा युवा भारत केद्र , अकोला याच्या मार्गदर्शना खाली सदर रॅलीचे आयोजन  करण्यात आले होते विलास वानखडे दिनेश श्रीवास यांनी आयोजन व नियोजन केले होते  रेलीचे  मुख्य आकर्षण म्हणजे तिरंगी झेंडे अनेक स्लोगन त्यामध्ये सायकल चालवा  पर्यावरण वाचवा ,  सायकल चालवा आरोग्य वाढवा इंधन वाचवा देश घडवा ,  पेट्रोलची बचत करून पर्यावरणाचे संरक्षण करूया ,  आठवड्यातून किमान एक दिवस सायकल चा वापर करा ,  अपने दिन को अच्छा बनाने के लिए सायकल का सफर करे और पर्यावरण बचाये ,  असे अनेक स्लोगना व्दारे  जनजागृती करण्यात आली 

शेवटी सायकल प्रेमीचा सत्कार करून प्रत्येकाला मेरा युवा भारत केंद्र , अकोला क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय भारत सरकारचे प्रमाणपत्र देण्यात आले दिनेश श्रीवास  गजानन चव्हाण जितू हसानी  अक्षय वानखडे लकी वानखडे यानी परीश्रम घेतले संचालन रवी गोंडकर यांनी केले तर आभार विलास वानखडे यांनी मानले

No comments:

Post a Comment