मुर्तीजापूर रेल्वे स्थानकावर “स्वच्छता अभियान मुर्तीजापुर”चा पाणी वाटप सेवा उपक्रम

  


प्रतिनिधी गजानन चव्हाण 

सध्या राज्यात ४५ ते ४६ डिग्रीपर्यंत तापमान पोहोचले असून, प्रखर उन्हामुळे सर्वसामान्य नागरिक आणि प्रवाशांचे हाल होत आहेत. अशा भीषण उष्णतेमध्ये मुर्तीजापूर येथील रेल्वे स्थानकावर “स्वच्छता अभियान मुर्तीजापुर”च्या वतीने दुपारी 1 ते 4 वाजता च्या रखरखत्या उन्हात आपल्या सेवाभावे वृत्तीने स्वच्छता अभियान मूर्तिजापूर चे शिलेदार येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना थंड व शुद्ध पाण्याचे वाटप करून त्यांची तहान भागवण्याचा सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाद्वारे दररोज अनेक प्रवाशांना दिलासा मिळत असून, संपूर्ण उन्हाळाभर ही सेवा अविरत सुरू ठेवण्याचा निर्धार स्वच्छता अभियानाच्या टीमने केला आहे. विशेष म्हणजे या सेवाकार्यात कोणत्याही प्रकारची जात, पात किंवा धर्म न पाहता सर्वांना समानतेने पाणी वाटप केले जाते. “पाण्याला कुठलाच धर्म नसतो” हा संदेश या उपक्रमातून समाजापुढे ठेवण्यात येत आहे.

या पुण्याच्या कार्यात रेल्वे प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी यांचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे. स्टेशन मास्टर वानखेडे साहेब, सर्व टी.सी., तसेच आर.पी.एफ. अधिकारी व कर्मचारी हे देखील या सेवाकार्यात सहभागी होत आहेत.

या सेवा उपक्रमात स्वच्छता अभियानचे सत्यनारायणजी तिवारी, विलास नसले, सुनिल भोजगढिया, रवि चौहाण,दिवाकर सोनोने,गजानन चव्हाण, दिनेश श्रीवास, जितेंद्र चौबे, विलास वानखडे,वैभव वानखडे,सचिन बोनगीरे, अकुंश अग्रवाल, दीपक खंडारे, ऋषीकेश वारे, , सुनिल अग्रवाल, इम्रानभाई, बबलू भेलोंडे, जयस्वाल सर,टाले सर, संतोष पाठक, अक्षय मोहड,आदी कार्यकर्ते सक्रिय सहभाग घेत आहेत.

ही पाणी वाटप सेवा पुढील एक महिना सुरू राहणार असून, या सेवाभावी कार्यासाठी ईश्वराने सर्वांना अधिक ताकद व प्रेरणा द्यावी आणि प्रवाशांची तहान भागवण्याचे हे कार्य असेच अखंड सुरू राहो, अशी भावना व्यक्त केली जात आहे या सतकार्याची सर्व कडे चर्चा चालू आहे,

No comments:

Post a Comment