महिरावणी येथील न्यू इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल १००%; शाम खांडबाहले ९१.२% गुणांसह प्रथम
प्रतिनिधी गणेश ठाकरे, लासलगाव (नाशिक)
माळी एज्युकेशन सोसायटी संचलित, न्यू इंग्लिश स्कूल (इंग्रजी माध्यम) महिरावणी विद्यालयाने दहावीच्या परीक्षेत १००% यशाची आपली वैभवशाली परंपरा यावर्षीही कायम राखली आहे. विद्यालयातील एकूण २५ पैकी २५ विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांचे अथक कष्ट, शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य या त्रिवेणी संगमामुळे हा गौरवशाली निकाल लागला आहे. या परीक्षेत गुणानुक्रमे यश संपादन केलेले अव्वल विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत :
१. शाम बबन खांडबाहले – ९१.२. (विद्यालयात प्रथम)
२. वेदिका नवनाथ चव्हाण – ९१.०० (विद्यालयात द्वितीय)
३. आदित्य सोमनाथ सोनवणे – ९०.४ (विद्यालयात तृतीय)
४. अनुष्का कचरू कापसे – ८९.००
५. तनिष्का दिनकर दाते – ८८.२
६ .तेजस संपत लहामगे _ ८८.२ %
निकाल केवळ संख्यात्मक नसून विद्यालयातील शिस्त, गुणवत्ता, सातत्य, संस्कार आणि शिक्षक सहकाऱ्यांच्या मुद्देसूद मार्गदर्शनाचे सुंदर फलीत आहे,
असे प्रतिपादन विद्यालयाचे उपक्रमशील व प्रेरणादायी मुख्याध्यापक नारायण शिंदे यांनी केले. तसेच मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
अभिनंदनासह करिअरसाठी नवी दिशा मिळत राहो. यशाची कमान सतत उंचावत राहो अशीच सदिच्छा.
अध्यक्ष सचिव
डॉ. सुभाष पवार डॉ. शितल पवार

No comments:
Post a Comment