लासलगाव शिक्षण साहाय्यक मंडळाच्या शाळांचा SSC निकालात झेंडा; विद्यार्थ्यांचे दैदीप्यमान यश



प्रतिनिधी .गणेश ठाकरे लासलगाव: 

मार्च २०२६ मध्ये झालेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (SSC) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, लासलगाव शिक्षण साहाय्यक मंडळ संचलित शाळांनी आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. लोकनेते दत्ताजी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९३.९८% लागला असून, जिजामाता कन्या विद्यालयाने ९६.१०% निकालासह घवघवीत यश संपादन केले आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांची यादी:

लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय:

प्रथम: कु. शिरसाठ ओम नितीन (९५.६०%)

द्वितीय: कु. पाटील यशराज कैलास (९३.००%)

तृतीय: कु. महाले संकेत सुरेश (९०.४०%

चतुर्थ: कु. निकम श्लोक शरद (८९.४०%)

चतुर्थ (संयुक्त): कु. कांगणे प्रविण बाळु (८९.४०%)

पाचवा: कु. कासारकर साईनाथ कैलास (८८.८०%)

जिजामाता कन्या विद्यालय:

प्रथम: कु. आहेर तेजल संतोष (९६.२०%)

द्वितीय: कु. चव्हाण प्रांजल रविंद्र (९४.८०%)

तृतीय: कु. आरोटे श्रुतिका सोमनाथ (९४.६०%)

चतुर्थ: कु.आघाव श्रावणी केशव (९४.४०%)

पाचवा: कु. शिरसागर समृद्धी प्रशांत (९२.८०%)


या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व संचालक मंडळ, विद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापिका आणि शिक्षक वृंदाने अभिनंदन केले आहे. सर्व स्तरांतून या विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


No comments:

Post a Comment