जिद्द आणि मेहनतीचे फळ! रिक्षाचालकाच्या कन्येचे गगनभरारी
उमरगा तालुका येथील येणेगुर कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयाचा ९५.७१% निकाल
उमरगा तालुका प्रतिनिधी 08/05/2026 परिस्थितीवर मात करण्याची जिद्द आणि कठोर परिश्रम असेल तर यश नक्कीच मिळते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या (SSC) निकालात कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले असून शाळेचा एकूण निकाल ९५.७१% लागला आहे. विशेष म्हणजे, या निकालात मुलींनीच बाजी मारली असून एका रिक्षाचालकाच्या मुलीने शाळेत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.मुलींचेच वर्चस्व: प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर मुलीच!यावर्षीच्या निकालात शाळेतील मुलींचाच मोठा गाजावाजा पाहायला मिळत आहे. शाळेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा तिन्ही क्रमांकावर मुलींनीच आपले नाव कोरले आहे. शाळेची विद्यार्थिनी कु , श्रावणी श्रीकांत कांबळे,हिने सर्वाधिक 90.20% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तिचे वडील व्यवसायाने रिक्षाचालक असून अत्यंत बेताच्या परिस्थितीत त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी घेतलेले कष्ट आज फळाला आले आहेत.शाळेचे गुणवंत विद्यार्थी:प्रथम: कु, श्रावणी श्रीकांत कांबळे

No comments:
Post a Comment