'भांडुप येथील श्री शिवमंदिराचा पुनरनिर्माण आणि जीर्णोद्धार कार्यक्रम संपन्न '.

 


 (वैभव कळस )

भांडुप येथील उत्कर्षनगर विकास मंडळ संचालित श्री शिवशंकर मंदिराचा पुनर्निर्माण, जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा रविवारी सर्व मान्यवर, रहिवासी आणि भाविकांच्या उपस्थितीत अतिशय भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

अतिशय भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या या सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी उत्कर्षनगर विकास मंडळ आणि स्वर्गीय भास्कर (दाजी) विचारे यांचे असलेले आपुलकीचे नाते उलगडले. दाजींनी सढळ हस्ते मंडळासाठी गेली अनेक वर्षे दिलेले योगदान फार मोलाचे आहे. २० वर्षांपूर्वी २००४ साली दाजींच्या माध्यमातून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. आता देखील त्यांच्याच माध्यमातून हे कार्य पुन्हा एकदा पूर्णत्वास आले आहे. 

परंतु हे पाहण्यासाठी दाजी आपल्यात नाहीत. पण या उत्कर्ष नगरच्या जनतेची भावना त्यांचं प्रेम सदैव दाजींसाठी राहील. आणि तोच वसा देखील मी पुढे नेईन अशी माझी खात्री आहे असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेचे म्हसळा येथील सदस्य अभिषेक विचारे यांनी केले.

श्री शिवशंकराची कृपा आणि मंडळाची सोबत कायम माझ्या पाठीशी असून ही वास्तू म्हणून स्वर्गीय दाजींच स्वप्न यात जिवंत आहे आणि ते अखंडपणे जिवंत ठेवण्याचा निर्धारही अभिषेक विचारे यांनी केला.


याप्रसंगी भांडुपचे आमदार  अशोकजी पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख  आम. रमेश कोरगावकर, शिवसेना महिला विभाग प्रमुख सौ. राजश्रीताई मांडवीलकर, नगरसेविका कु. राजुलताई पाटील, नगरसेविका सौ. ज्योतीताई राजभोग, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका प्रमुख  आनिल राजभोग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष  शशिकांत सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई सचिव  प्रतापजी राजे शिर्के, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला तालुका प्रमुख सौ. सुनंदाताई वफारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ११४ चे शाखाप्रमुख  राजेश कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ११४ च्या प्रभाग अध्यक्षा सौ. गीताताई ननगरे, भांडुप येथील उत्कर्षनगर विकास मंडळाचे सचिव  विलासजी मरगज आदी मान्यवर, मंडळाचे सर्व पदाधिकारी, रहिवाशी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment