समता परिषदेच्या चित्ररथाचे स्वागत



प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी 

कळमुनरी, : क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवाच्या निमित्ताने ११ एप्रिल २०२६ एप्रिल ते १० एप्रिल २०२७ या वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानिमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली, माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या संकल्पनेतून महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्ररथाची निर्मिती करण्यात आली आहे. महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने हा चित्ररथ महाराष्ट्रभर फिरविण्यात येत आहे. कळमनुरीत या रथाचे आगमन होताच स्वागत करण्यात आले.

या चित्ररथाचे कळमनुरीनंतर हिंगोली शहरांमध्ये ही अग्रसेन चौकामध्ये आगमन होताच स्वागत करण्यात आले. या रथाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष चंद लव्हाळे, महिला जिल्हाध्यक्ष वनिताताई गुंजकर, रवि शिंदे, रघुनाथ शेवाळे, कांता पाटील, ॲड. गुणनंद पतंगे, वसंत वाघ, विठ्ठल पारस्कर, केशवराज जांबुतकर,

बालाजीराव सोनवणे, लिंबाजीराव थोरे, आत्माराम सातव, कैलास सातव, सुरेश ढोरे, भागवत बोधने, कैलास भोंडवे, ज्ञानोबा गव्हाणे, गणेश बांगर, वामनराव पवार, लक्ष्मणराव ढोले, संजय सातव, पोपळघट, जयश्री सातव, ज्योती दिघडे, ज्योती धुळे, मीराताई पोपळघट, स्वराज वाघ, साहिल चौधरी, कैलास खिल्लारे आदींची उपस्थिती होती.


No comments:

Post a Comment