शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे उद्घाटन राधानगरी येथे संपन्न
भोगावती खोरा प्रतिनिधी
तहसीलदार कार्यालय राधानगरी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे उद्घाटन राधानगरी येथे संपन्न झाले.
-- महसूल विभागांतर्गत ग्रामिण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान" आयोजित करण्यात आले.
-- सामान्य नागरिकांच्या महसूल विषयक अडचणी तत्परतेने मार्गी लागाव्यात, प्रशासन अधिक लोकाभिमुख व्हावे आणि जनतेला शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर निश्चितच जनहितासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
-- शासनाच्या सर्व योजना तळागाळातील लोकांपर्यत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
-- यामध्ये कृषी विभाग मधील ट्रॅक्टर, पॉवर ट्रिलर, कृषी यांत्रिकी अवजार वाटप,
पि.एम.किसान दुरुस्ती,
-- आरोग्य विभाग- ब्लड कॅम्प /सीडीसी, गोल्डन कार्ड, X Ray,आयुष्यमान कार्ड, वयोवंदना कार्ड यांचे वाटप.
-- भूमि अभिलेख मधील सर्व कामे
-- महिला व बालविकास मधील बेबी किट वाटप व इतर.
-- संजय गांधी निराधार के.वाय.सी करणे.
-- पुरवठा विभाग मधील कातकरी समाजाला व इतर लाभार्थ्यांना रेशन कार्ड वाटप.
-- महसूल विभाग- फेरफार,7/12 , वारसा ठराव,8 अ वाटप अश्या सर्व शासनाच्या व वैयक्तिक लाभाच्या योजनांचे वाटप प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तहसिलदार मा.अनिता देशमुख मॅडम,गोकुळ संचालक अभिजीत तायशेटे,राधानगरी तालुका वैद्यकीय अधिकारी.मा. डॉ. शेटेसो यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, पो.पाटील,शेतकरी व लाभार्थी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment