पेरणोली शताब्दी महोत्सव सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला



भोगावती खोरा प्रतिनिधी,

शाळेचं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अनन्यसाधारण स्थान आहे. कारण ती शाळाच असते, जी विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवते. भविष्यातील आव्हानांसाठी त्यांना तयार करते. पुढे हेच विद्यार्थी शाळेकडून मिळालेल्या शिक्षण व संस्काराच्या जोरावर मोठी उंची गाठतात आणि शाळेचा नावलौकिक वाढवतात. त्यामुळे हे विद्यार्थीच शाळेचं खरं वैभव असतात.

आज इंग्रजी शाळांचं सगळीकडे पिक आलेलं असताना एक मराठी शाळा अशी आहे, जिने शंभरी गाठत आजही आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे, ती म्हणजे पेरणोली येथील केंद्रीय शाळा विद्यामंदिर. आज या शाळेतून शिकून गेलेले विद्यार्थी विविध क्षेत्रात मोठ्या पदांवर आहेत आणि समाजात त्यांना अतिशय मानाचे स्थान आहे. त्यांच्या या यशाचे श्रेय ते आजही शाळेला देतात.

नुकताच या शाळेचा शताब्दी महोत्सव सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. अनेक आजी-माजी विद्यार्थी या सोहळ्यासाठी उपस्थित होते. काही माजी विद्यार्थी तर असे दिसले, ज्यांनी वयाची नव्वदी ओलांडून आजही ते अगदी निरोगी आणि तंदुरुस्त आहेत. प्रत्येकाने आपले आरोग्य हे त्यांच्याप्रमाणे जपले पाहिजे, असे यावेळी आवर्जून नमूद केले. 

या कार्यक्रमास पालकमंत्री प्रकाश आबिटकर   डॉ. नंदकुमार मोरे (मराठी विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) मा. सुधीर भाऊ देसाई (जि.प. सदस्य, कोल्हापूर), मा. शिरीष देसाई (जि.प. सदस्य, कोल्हापूर), मा. जयश्री गाडे (सभापती, पं.स. आजरा) मा. यशोदा युवराज पोवार (उपसभापती, पं.स. आजरा) मा. राजेंद्र सावंत (जिल्हा उपप्रमुख शिवसेना), मा. सुभाष सावंत (गटविकास अधिकारी, आजरा), मा. समीर माने (तहसिलदार, आजरा), मा. बसवराज गुरव (गटशिक्षणाधिकार, पं.सं. आजरा), मा. रावसाहेब देसाई (केंद्र प्रमुख, पेरणोली), मा. वनश्री रवींद्र देसाई (लोकनियुक्त सरपंच, पेरणोली), मा. उदयराज पवार (अध्यक्ष, शताब्दी महोत्सव संयोजन समिती), मा. अविनाश जोशिलकर (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती), मा. एकनाथ पाटील (केंद्र मुख्याध्यापक, पेरणोली) तसेच ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:

Post a Comment