न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बारागांव पिंपरीच्या ३९ विद्यार्थ्यांची NMMS शिष्यवृत्तीसाठी निवड
प्रतिनिधी = गणेश ठाकरे लासलगाव :
साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिकरोड संचलित बारागांव पिंपरी येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने 'राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना' (NMMS) २०२५-२६ च्या परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या परीक्षेत विद्यालयातील तब्बल ३९ विद्यार्थी पात्र ठरले असून, त्यांना ९ वी ते १२ वी पर्यंत एकूण ४८,००० रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
विद्यार्थ्यांचे विशेष यश:
या परीक्षेत विद्यालयातील कु. वाळुंज आदिती भाऊसाहेब हिने जिल्ह्यात दुसरा क्रमांक, कु. सानप सोहम दत्तु याने जिल्ह्यात चौथा क्रमांक आणि कु. सानप अथर्व अरुण याने जिल्ह्यात ८ वा क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांची नावे:
या परीक्षेत यशस्वी झालेल्या इतर विद्यार्थ्यांमध्ये कु. सानप वैशाली, कु. कडलग साक्षी, कु. गायकवाड समिक्षा, कु. गोसावी सानिका, कु. विरकर मनिषा, कु. सांगळे संजीवनी, कु. नखाते संस्कृती, कु. उगले संस्कृती, कु. मालेराव संस्कृती, कु. पावसे नयना, कु. उगले वैष्णवी, कु. उगले सृष्टी, कु. हुशार हर्षदा, कु. तुपे श्रुती, कु. नखाते अंकिता, कु. सांगळे अनुष्का, कु. गीते कोमल, कु. मन्यार मंतशा, कु. पगार शोभना, कु. उगले सयाली, कु. व्यवहारे भक्ती, कु. सातपुते ईश्वरी, कु. शिंदे नुतन, कु. शिंदे संदिप, कु. शेळके संस्कार, कु. सानप लक्ष्मीकांत, कु. सिरसाट आर्यन, कु. सातपुते चैतन्य, कु. गुळवे शुभम, कु. ढोमणे पियुष, कु. उगले प्रज्वल, कु. सातपुते विनय, कु. उगले साहिल, कु. कोरे कुणाल, कु. गुळवे तुषार आणि कु. उगले ऋषिकेश यांचा समावेश आहे.
मार्गदर्शक शिक्षकांचे योगदान:
विद्यार्थ्यांच्या या यशात विभाग प्रमुख श्री. संदिप लंडे यांच्यासह मार्गदर्शक शिक्षक श्री. मोरे सचिन, श्री. कानवडे प्रताप, श्री. राठोड कृष्णा, श्री. ठाकरे धनराज, श्री. शेख सलीम, श्री. एखंडे निलेश, श्री. कोटमे गुलाब, श्रीमती पानसरे मोनिका, श्रीमती आव्हाड सुनिता, श्रीमती परदेशी मेघाली, श्रीमती कापसे गायत्री आणि श्रीमती वाकचौरे स्मिता यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे प्रशासक, प्राचार्य, पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

No comments:
Post a Comment