संस्थापक अध्यक्षांच्या पुतळ्याचे अनावरण; प्राचार्य नारायण कोलते यांचा सेवा गौरव सोहळा उत्साहात
प्रतिनिधी सोयगाव.. दिलीप मोरे...
सोयगाव दि.१५रोजी सावळदबारा जय कालिंका देवी शिक्षण प्रसारक संस्था संचलित छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात संस्थापक अध्यक्ष कै. लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच सेवानिवृत्त प्राचार्य नारायण कोलते यांच्या सेवा गौरव सोहळ्याचा भव्य कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. शिक्षण क्षेत्रात चार दशकांहून अधिक काळ योगदान देणाऱ्या नारायण कोलते यांचा सहपत्नीक जाहीर सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भावराव कोलते होते. उद्घाटक म्हणून रंगनाथ (नानासाहेब) काळे व द्वाराकाभाऊ पाथरीकर यांच्या हस्ते संस्थापक अध्यक्षांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी सुरेश बनकर, ईद्रीस मुलतानी, शिवाजी बुढाळ, जयप्रकाश चव्हाण, उत्तम चव्हाण, राहुल राठोड, मोहन पा. सोनवणे, तुकाराम कळम, मोकळ सर, बडक सर, राजमल चव्हाण, जनार्धन साबळे, डॉ. सुदाम चव्हाण, दीपक ढोमणे, नितू ठाकूर तसेच सोयगाव तालुक्यातील पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. डॉ. पुंडलिक कोलते यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “कै. नानासाहेब कोलते यांनी आदिवासी व डोंगराळ भागात शिक्षणाची गंगा आणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही संस्था उभी केली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज संस्थेचा वटवृक्ष झाला आहे.”
ईद्रीस मुलतानी यांनी संस्थेच्या कोणत्याही अडचणीच्या वेळी आपण संस्थेसोबत खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही दिली. मुख्याध्यापक संघाचे राज्य कार्याध्यक्ष मोहन पा. सोनवणे यांनीही कोलते सरांच्या कार्याचा गौरव करत संस्था व शाळांच्या पाठीशी संघटना कायम राहील, असे आश्वासन दिले.
अध्यक्षीय भाषणात रंगनाथ (नानासाहेब) काळे यांनी कै. लक्ष्मणराव कोलते यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला. “सावळदबारा परिसराच्या शैक्षणिक विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. अशा दूरदृष्टीच्या व्यक्तिमत्त्वाच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा सन्मान आम्हाला लाभला, ही अभिमानाची बाब आहे,” असे ते म्हणाले.
यावेळी संस्थेच्या प्रशासन व शैक्षणिक कामकाजाची जबाबदारी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून जीवन कोलते यांच्याकडे सोपविण्यात आली. तसेच संस्थेचे प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य नारायण कोलते यांच्याकडे कारभार देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बहुमताने घेण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रवीणकुमार सरकटे व प्रा. पंजाबराव शेळके यांनी केले. कार्यक्रमास संस्था संचलित सर्व शाळांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, पत्रकार, परिसरातील सरपंच-उपसरपंच, प्रतिष्ठित नागरिक तसेच आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावळदबारा, जय भवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोलखेडा, संत सेवालाल महाराज माध्यमिक विद्यालय देव्हारी तसेच कै. लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व कर्मचारी यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
सेवानिवृत्त प्राचार्य नारायण कोलते यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांना स्मृतिचिन्ह भेट देण्यात आले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अशी माहिती बाबासाहेब कोलते यांनी दिली.

No comments:
Post a Comment