'आयडियल इंग्लिश स्कूल म्हसळा चा शैलेश कापरे झाला MBBS, सर्वत्र कौतुक

 


 (वैभव कळस )

मुळचे धाराशिव येथून हॉटेल व्यवसाईक म्हणून म्हसळा येथे आलेले स्व. चंद्रकांत कापरे यांच्या मुलांचे इयत्ता १२ आणि नीट चे शिक्षण म्हसळा येथे झाले. कुमार शैलेश कापरे याचे पहिले ते दहावी पर्यंतचे शिक्षण आयडियल इंग्लिश स्कूल म्हसळा येथे झाले. पुढे 

अकरावी आणि बारावी शिक्षण, आणि नीट , सोबत नीट च्या  तयारी साठी शैलेश लातूर येथे जाऊन आपले नीट पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले.  

२०२१ मध्ये नीट परीक्षा उत्तीर्ण होऊन भारती विद्यापीठाचे सांगली येथील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल सांगली येथे त्याने MBBS  साठी प्रवेश मिळवीला. वडिलांचे आकस्मित निधन झाल्याने शैलेश वडिलांच्या मार्गदर्शनास मुकला परंतू तो हताश न होता त्याने आपली इच्छा आणि आकांशा न सोडता आपली आई म्हसळा नगरपंच्यातीच्या माजी नगराध्यक्षा आणि विद्यमान नगरसेविका जयश्री कापरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण पुर्ण केले. 

दिनांक ६ मे रोजी त्याच्या MBBS चा निकाल लागला आणि शैलेश ने आपल्या आई -वडिलांचे स्वप्न पुर्ण केले  स्व.चंद्रकांत विश्वनाथ कापरे आणि जयश्री चंद्रकांत कापरे यांचे सुपुत्र डॉ. शैलेश चंद्रकांत कापरे यांनी घवघवीत यश मिळविल्या बद्दल सर्वत्र कौतुक होतं असून  कापरे आणि गव्हाणे परिवारइकडून  आनंद व्यक्त होतं आहे.

No comments:

Post a Comment