खरीप हंगामपूर्व शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
मानोरा प्रतिनिधी: (जगदीश राठोड)
मौजे खेर्डा/वार्डा, ता. मानोरा : तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मानोरा यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगामपूर्व शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात फार्मर कप व FGL मध्ये सहभागी झालेल्या शेतकरी बांधवांना माती परीक्षण, बियाण्यांची उगवणक्षमता चाचणी, अळी नियंत्रण तसेच दशपर्णी अर्क बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. याशिवाय खरीप हंगामासाठी योग्य बियाण्यांची निवड, पेरणीची शास्त्रीय पद्धत आणि शेती व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या मार्गदर्शन कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अशा उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळून उत्पादनवाढीस चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

No comments:
Post a Comment