जेसीबीने उपटली ८ वर्षाची मोसबी बाग
प्रतिनिधी :- रामेश्वर तोंडे मेहकर
चिखली विदर्भातील शेतकरी पारंपरिक सोयाबीन, तूर आणि कापूस पिकांवर अवलंबून राहून अनेक वर्षे शेती करत आला. मात्र सततचे बदलते हवामान, अवकाळी पाऊस, दुष्काळ, रोगराई आणि उत्पादन खर्चात झालेली प्रचंड वाढ यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. विशेषतः गत काही वर्षांपासून सोयाबीन पिकाला येणारी जडती, उत्पादनातील घट आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे अनेक शेतकरी पर्यायी उत्पन्नाच्या शोधात फळबागांकडे वळले.
पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांप्रमाणे फळबागायती करून आर्थिक उन्नती साधावी,या आशेने बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील श्री सिद्धेश्वर भगवान यांच्या पावन भूमीतील कोलारा येथील कष्टाळू शेतकरी सिद्धेश्वर तुकाराम सपकाळ यांनी २०१७मध्ये आपल्या शेतात मोसंबीची बाग लावली. मोठ्या आशेने आणि कुटुंबाच्या भविष्याचा विचार विचारव करून त्यांनी लाखो रुपये खर्च करत ही बांग उभी केला. आठ वर्षांपासून मुलाबाळाप्रमाणे या झाडांची निगा राखली. पाणी, औषध फवारणी, खत, मजुरी, त्यांनी सातत्याने खर्च केला. वीजबिल, सिंचन यासाठी मात्र निसर्गाच्या अवकृपेने आणि शासनाच्या उदासीन धोरणामुळे या बागेतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. उलट उत्पादन खर्चही निघत नसल्याने सपकाळ कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले.
अखेर शासनाच्या निष्क्रियतेला आणि सततच्या तोट्याला कंटाळून सिद्धेश्वर सपकाळ यांनी बुधवारी आपल्या आठ वर्षांच्या मोसंबी बागेवर जेसीबी फिरवत झाडे उपटून टाकण्याचा हृदयद्रावक निर्णय घेतला. हा प्रकार पाहून परिसरातील शेतकरीही हळहळ व्यक्त करत होते. यावेळी प्रतिक्रिया देताना होत म्हणाले की, 'दोन सिद्धेश्वर सपकाळ भावनिक वर्षांपासून आम्ही आठ हजार रुपये फळबाग विमा भरत आहोत. पण नुकसान होऊनही शासनाकडून एक रुपयाची मदत मिळाली नाही. निसर्गाचं संकट आणि शासनाचं दुर्लक्ष याला आम्ही कंटाळलो आहोत. त्यामुळे जड अंतःकरणाने ही
झाडं उपटून टाकत आहोत. सपकाळ यांच्या या निर्णयामुळे विदर्भातील फळबाग शेतकऱ्यांची भीषण अवस्था पुन्हा समोर आली आहे. शासन फळबाग लागवडीस प्रोत्साहन देत असले तरी प्रत्यक्ष नुकसानभरपाई, विमा रक्कम आणि बाजार व्यवस्थापनात मात्र शेतकरी वाऱ्यावर सोडला जात असल्याची भावना ग्रामीण भागात तीव्र होत आहे.
कोलारा येथील सिद्धेश्वर सपकाळ यांनी उपटलेली मोसंबी बाग ही केवळ एका शेतकऱ्याची वेदना नसून विदर्भातील हजारो शेतक-यांच्या मनातील असंतोष आणि शासनावरील शेतकऱ्यांच्या नाराजीचे प्रतीक आहे.

No comments:
Post a Comment