सालतवाडा येथील चंद्रमणी वानखडे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2026 प्रदान



 प्रतिनिधी गजानन चव्हाण 

युवा महाराष्ट्र फॉउंडेशन,पुणे भारतीय महाक्रांती सेना पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते चंद्रमणी वानखडे सर यांना 2026 चा मानाचा महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार गुरवार दि. 14/04/2026 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह येरवडा पुणे येथे संध्याकाळी पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ. अविनाश साहाकुंडे (इटरनॅशनल प्रेसिडेंट, इंटरनॅशनल ह्यूमन राईट अंबेसिडर,) अश्विनीताई लांडगे (मा. नगरसेविका,) सागर कटारे( सामाजिक कार्यकर्ते ), डॉ. रवी अग्रवाल (लायन क्लब, पुणे प्रेसिडेंट), महेश थोरवे (डायरेक्टर MIT पुणे) यांच्या हस्ते प्रशीस्त पत्र, पुरस्कार तालिका देऊन प्रदान करण्यात आला,कार्यक्रमा साठी त्यांचे मित्र अजय खांडेकर, शरद खांडेकर,अभिजीत  खंडारे, आता पर्यंत त्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सामाजिक पुरस्कार, महाराष्ट्र गुण रत्न राज्यस्तरीय पुरस्कार, असे पुरस्कार मिळाले आहे त्यांनी या पुरस्काराचे श्रेय आपली आई रुखमाबाई वानखडे व विद्यार्थी गजानन चव्हाण यांना दिले आहे व हा पुरस्कार साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांना अर्पण केला आहे,चंद्रमणी वानखडे सर हे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या कार्याने प्रसिद्ध आहेत,

ज्यांनी आपल्या कार्याने समाज, संस्कृती आणि राष्ट्राला दिली आहे त्या तेजस्वी व्यक्तींना,ज्यांनी महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे.अशा व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो,हा पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे नातेवाईक, मित्र मंडळी, गावकरी मंडळी, जि. प. शाळा सालतवाडा चे शिक्षक वर्ग यांच्या कडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment