न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा ची विद्यार्थिनी तनुष्का कदम ९३. ०२ टक्के गुण मिळवून दहावीत प्रथम '.-



मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा ची विद्यार्थिनी तनुष्का मंगेश कदम हिने ९३. ०२ गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळावीला. श्रेयस समीर पवार याचा द्वितीय क्रमांक ( ८८. ०६ %),मोरे श्रेया दिपक तिसरा क्रमांक (८७. ०४ %), श्रवण सुरेश गायकर चौथा क्रमांक (८७%), वैभवी बाळू मगर पाचवा क्रमांक (८५. ०८%). मागास वर्गीयमध्ये श्रेया मोरे प्रथम (८७. ०४), द्वितीय क्रमांक श्रवण गायकर (८७%), तृतीय क्रमांक श्रावणी नांदगावकर (८६. ०६%)म्हसळा तालुक्यातील इतर शाळांचे निकाल खालील प्रमाणे आंबेत हायस्कूल १००%, न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा ९८. ८८%, अंजुमन हायस्कूल म्हसळा ९६. ९६, आयडियल इंग्लिश स्कूल म्हसळा १००%, खामगाव हायस्कूल १००%, पांगलोली हायस्कूल १००%, खरसई हायस्कूल ८८. २३%, देवघर हायस्कूल ८५. ७१%, नेवरूळ हायस्कूल ९१. ६६, पाभरे हायस्कूल ७८. १२%, आगरवाडा हायस्कूल ८७. ५०%, गोंडघर हायस्कूल ९१. ६६%, केलटे हायस्कूल ८०%, पाष्टी हायस्कूल ९७. २३%, संदेरी हायस्कूल १००%, मेंदडी हायस्कूल ५५. ५५%, व्हिजन इंटरनॅशनल स्कूल १००%.  

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जि. प. सदस्य अभिषेक विचारे, अनिल बसवत, सभापती बबन मनवे, उपसभापती लहू म्हात्रे, प्रियांका निंबरे, समृद्धी चाचले, तहसीलदार सचिन खाडे, पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे, गटविकास अधिकारी माधव जाधव, गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे,जमीर कादिरी, नईम हसवारे,हलका प्रेसिडंट फझल हलडे,चेअरमन नासिर मिठागरे,सर्व स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, ग्रामस्थ, न्यू इंग्लिश स्कूल अध्यक्ष समिर बनकर, प्राचार्य डी. आर. पाटिल, अंजुमन प्राचार्य अ. रहमान घराडे, आदी मान्यवरांनी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment