ग्राम गिर्डा /वार्डा येथे महामानवांना वंदना कार्यक्रम उत्साहात संपन्न
प्रतिनिधी – जगदीश राठोड,
ग्राम गिर्डा /वार्डा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध वंदना व महामानव वंदना कार्यक्रम अत्यंत उत्साहात व भीममय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदना व त्रिशरण-पंचशील ग्रहण करून करण्यात आली.
या प्रसंगी ग्रामस्थ, युवक, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक समता, न्याय व बंधुता या विचारांवर मार्गदर्शन करण्यात आले. भीमगीतांच्या सादरीकरणाने संपूर्ण वातावरण भारावून गेले.कार्यक्रमात एकता, शिक्षण व समाज प्रगतीचा संदेश देण्यात आला. सोहळा शांततेत व यशस्वीरीत्या पार पडला.

No comments:
Post a Comment