लिंगायत समाजाच्या विविध मागण्यासाठी आमरण उपोषण : सागर कोरे



 प्रतिनिधी - मोहसीन इनामदार ,जत 

 लिंगायत समाजाच्या प्रलंबित प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जत येथील लिंगायत समाजाचे युवा नेते श्री . सागर कोरे यांनी जत येथील महात्मा बसवेश्वर पुतळ्यासमोर 13.04.2026 पासून आमरण उपोषणास सुरवात केली आहे . भारतीय राज्यघटनेनुसार अल्पसंख्याक व सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्गासाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात परंतु दुर्दैवाने लिंगायत समाजाला अनेक शासकीय लाभ व योजना पासून वंचित ठेवण्यात आले आहे . त्याच प्रमाणेसागर कोरे यांच्या पुढील प्रमाणे प्रमुख मागण्या आहेत 1)लिंगायतसमाजाला स्वतंत्र धार्मिक अल्पसंख्याक दर्जा देऊन त्या बद्दलचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे तातडीने शिफारस करून पाठवावा 2) महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ पूर्णपणे कार्यान्वित करून लिंगायत समाजातील सर्व घटकांना त्याचा लाभ मिळावा .  तसेच महामंडळातील अध्यक्ष सहित सर्व पदाधिकारी लिंगायत समाजाचे असावे 3) मंगळवेढा (जिल्हा सोलापूर ) येथे जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक तातडीने पूर्ण करावे 4) शालेय पाठ्यपुस्तकात जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर यांचा सविस्तर इतिहास समाविष्ट करावा 5) प्रत्येक जिल्ह्यात लिंगायत समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी सुसज्य शासकीय वसतिगृह उभारण्यात यावे 6) जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर यांची संपूर्ण भारतात अधिकृत रित्या साजरी करून सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी 7)सर्व शासकीय कार्यालयामध्ये इतर महापुरुषाप्रमाणे जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा लावण्याचे आदेश निर्गमित करावे 8)महाराष्ट्र विधान भवन परिसरात जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात यावा 9) लिंगायत समाजाची श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानच्या विकासासाठी विशेष तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर करून तिथे भक्तनिवास आणि मूलभूत सुविधा पुरवाव्यात 10)लिंगायत समाजाच्या विध्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा तयारीसाठी आणि संशोधनासाठी बसव आंतरराष्ट्रीय संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करावी 11)महात्मा बसवेश्वरांच्या वचन साहित्याचा मराठी मराठी भाषेत अधिक प्रभावीपणे प्रसार करण्यासाठी स्वतंत्र साहित्य अकादमी किंवा अभ्यासकेंद्र सुरु करावे 12) लिंगायत समाजातील महिला बचत गटासाठी विशेष योजना राबवून त्यांना लघुउद्योगासाठी प्रोत्साहन आणि बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी . 

तरी जो पर्यंत शासन ठोस निर्णय घेत नाही तो पर्यंत हे आंदोलन शांततेत चालू राहील असे सागर कोरे म्हणाले . 

यावेळी चंद्रकांत गुडोडगी , बाळासाहेब तंगडी , किरण बिज्जरगी व अन्य लिंगायत समाजाचे बांधव उपस्थित होते

No comments:

Post a Comment