होमगार्ड चे सेक्शन लीडर रामभाऊ वानखडे यांचे सेवानिवृत्ती.



 प्रतिनिधी गजानन चव्हाण 

 अकोला होमगार्ड जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक मा. रेड्डी सर अकोला यांच्या आदेशाने व अकोला जिल्हा होमगार्ड कार्यालयांचे केंद्र प्रमुख पोहरेसर, डोंगरेसर,असोलकर सर, आघावसर, देशमुखसर यांच्या मार्गदर्शनाखाली, मूर्तिजापूर तालूका समादेशक तथा, कंपनी नायक  दिलीप नाईकसर यांच्या संकल्पनेतून मूर्तिजापूर  होमगार्ड पथकातील सेक्शन लीडर रामभाऊ दयाराम वानखडे यांचा आज रविवार दि 05/04/2026  रोजी होमगार्ड कार्यालय मुर्तीजापुर येथे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित केला होता,या कार्यक्रमाचे अध्यक्ष व.प ना उषा वानखडे .तर प्रमुख अतिथी पलटण नायक संतोष महल्ले,प.ना. महादेव नेमाडे ,प. ना.राहुल तोडकर , कंपनी सार्जेंट मेजर गजानन चव्हाण, सार्जेंट अक्षय चिकणे,कार्यालयाचे किशन रुमाले आदी हे होते,गजानन चव्हाण यांनी आपल्या भाषणात रामभाऊ वानखडे यांच्या बद्दल बोलत आपण जे आपल्या जिवानातील अनमोल दिवस होमगार्ड सेवेसाठी अर्पन के़ले ही सघटना त्या साठी आभारी आहे व आपल्या सारखे व्यक्तीमत्व संघटने मधून सेवानिवृत्त होणे म्हणजे आमच्या साठी कभी ख़ुशी कभी गम अशी अवस्था आहे त्यांना वाढदिवसाच्या व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या,रामभाऊ यांनी आपल्या भावनिक भाषणात म्हटले की मला या संघटनेने भरपूर काही दिले आज या मुळे आपण सर्व माझ्या सोबतीला आहे व जो संघटनेत भारती होतो तो सेवानिवृत्त पण होतो, माणसाने नेहमी इतरांशी चांगले राहावे जेणे करून सेवानिवृत्त नंतर लोक आपल्याशी जुळलेले राहतील,आज त्यांच्या सेवानिवृत्त दिनी त्यांच्या डोळ्या मधून अश्रू पाहत, बाकीच्या सैनिकांच्या डोळ्या मधून अश्रू वाहत होते हे विशेष, सैनिकांनी त्यांना सेवानिवृत्त व वाढदिवसाच्या व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,रामभाऊ हे 1988 मध्ये वयाच्या 20 व्या वर्षी  होमगार्ड संघटने मध्ये दाखल झाले, ते पथकाचे सर्वात सिनियर होते,.आज योगायोग  म्हणजे त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात त्यांचा  वाढदिवस सुद्धा.होता, याच कार्यक्रमात  त्यांचा वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आला. त्यांनी आपली सेवा अकोला, अमरावती,,तेलंगणा, मध्यप्रदेश, मुंबई, नागपूर, बुलढाणा, जळगाव, कुंभमेळा नाशिक, यवतमाळ,महाराष्ट्र व बाहेर राज्यात व विदर्भातील अनेक भागात त्यांनी आपली कर्तव्य दक्ष प्रमाणे सेवा दिली,ते माना पोलीस स्टेशन मध्ये होमगार्ड चे इन्चार्ज पण होते, त्यांनी आपल्या कारकीर्दीत हायवेवरील अपघातग्रस्तांचे अनेक जीवे वाचवून आपल्या कर्तव्यदक्षाचे प्रमाणपत्र दिले. त्यांच्या या मनमिळावू स्वभाव या स्वभावाने समोरच्या व्यक्तीला मनमोहून घेत होता. आज त्यांच्या सेवेला 38 वर्षे पूर्ण होऊन मूर्तिजापूर पथकातील अधिकारी यांच्या कडून त्यांना शॉल, श्रीफळ,सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

 या कार्यक्रमासाठी मूर्तिजापूर पथकातील सर्व अधिकारी पुरुष  व महिला होमगार्ड सैनिक हजर होते..


No comments:

Post a Comment